Home मराठवाडा ..आता रानडुक्कर घुसले गावात, घरासमोर बसलेल्या मजुरांवर हल्ला, गल्लीबोळात धुमाकूळ

..आता रानडुक्कर घुसले गावात, घरासमोर बसलेल्या मजुरांवर हल्ला, गल्लीबोळात धुमाकूळ

171

घनसावंगी / लक्ष्मण बिलोरे

जालना – जिल्ह्य़ातील घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथे बुधवारी संध्याकाळी रानडुक्कराने गावात धुमाकूळ घातल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. आजवर शेतातील उभ्या पिकाची नासाडी करणारे रानडुक्कर आता गावात घुसू लागल्याने महिला, लहान मुलांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.

काल पारडगावात घरासमोर बसलेल्या मजुरांना रानडुक्कराने प्राण घातक हल्ला केला. गजानन घनवट याच्या हाता पायाला डुक्कराने कडकडून चावा घेतला, गजानन घनवट रानडुक्कराने केलेल्या अचानक हल्ल्यामुळे घाबरून गेला जखमी अवस्थेत जीवाच्या आकांताने बावचळून गेला. काय झाले हे कळण्याअगोदर गजानन रक्तबंबाळ झाला. त्याला जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे . दरम्यान, गोदावरी नदीच्या काठी असलेल्या उक्कडगाव, भादली, शिवणगाव, गुंज, राजाटाकळी, मुद्रेगांव, जोगलादेवी, मंगरूळ, कोठी, अंतरवाली टेंभी, रामसगाव शेतशिवारात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात असल्याने रानडुक्करं माजली आहेत.ऊसाच्या पिकाच मोठे नुकसान होत आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रानडुक्करांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.