July 9, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

बदनापूर येथे चेहऱ्यावर मास्क नसलेल्या 38 वाहन धारकांकडून 19 हजार दंड वसूल

उडाली खळबळ

सय्यद नजाकत – बदनापूर

जालना – कोरोना रोगाचा प्रादुभाव थांबिण्यासाठी तोंडाला मास्क व सिनेटायझर चा वापर नियमिय करण्याच्या सूचना दिलेल्या असतांना देखील कोविड १९ च्या नियमांचे नागरिक उल्लंघन करीत असल्याने बदनापूर पोलिस व नगर पंचायतच्या संयुक्त पथकाने सकाळी ९ वाजेपासून जालना-औरंगाबाद महामार्गावर धडक मोहीम राबवून चेहऱ्यावर मास्क नसलेल्या 38 वाहनधारकांकडून 19 हजार दंड वसूल करण्यात आला तर दोन हॉटेल चालकांना दंड ठोठावला असून सदर कारवाई पोलिस निरीक्षक मारुती खेडकर व नगर पंचायत मुख्य अधिकारी डॉ.पल्लवी अंभोरे यांच्या मार्गदर्शनखाली करण्यात आली त्यांचे सहकारी सकाळपासून महामार्गावर तळ ठोकून होते. यावेळी नगर पंचायतच्या मार्फत विना मास्क फिरणाऱ्यांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात आला.

जालना जिल्हयात कोरोना रोगाचा दिवसेंदिवस प्रार्दूभाव वाढत चाललेला असून सुरुवातीपासून बदनापूर पोलिस व नगर पंचायत प्रशासनाने केलेल्या कामामुळे बदनापूरात कोरोनाला पाय रोवता आला नव्हता. मध्यंतरी दोन व्यापारी व त्यांचे दोन कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली होती. तेही तंदुरुस्त होऊन घरी आलेले आहे. त्यानंतर शहरात कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन मोठया प्रमाणात प्रयत्न करत आहेत. सरकारच्या नियमानुसार चेहऱ्यावर मास्क घातल्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी न येण्याचे निर्देश आहेत, परंतु बदनापूर शहरात काही ठिकाणी मास्क न लावता सार्वजनिक ठिकाण येत असल्याच्या निदर्शनास आल्यामुळे बदनापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, पोलिस उपनिरीक्षक पूजा पाटील यांनी गुरुवारी सकाळी ९ वाजेपासून थेट जालना- औरंगाबाद महामार्गावर तळ ठोकून चेहऱ्यावर मास्क नसणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्यांवर थेट कारवाई करत नगर पंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने दंड वसूल केला.

यावेळी पोलीस निरीक्षक एम.बी.खेडकर,पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख इब्राहिम, चरणसिंग बमनावत, यांच्यासह नगर पंचायतचे ज्ञानेश्वर रेवगडे,राजेश शर्मा ,गणेश ठुबे,चंद्रकांत पवार,भारत पवार,रशिद पठाण,सय्यद दस्तगिर, तेजराव दाभाडे, हिंमत कांबळे, अशोक बोकन आदी कर्मचारी या कारवाई मध्ये सहभागी झाले होते नगर पंचायतच्या माध्यमातून दंड वसूल करण्यात येत होता. यावेळी 38 विना मास्कवाल्यांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात आला. तर विना परवानगी हॉटेल सुरू करणाऱ्या दोघांकडून 2500 रुपये वसूल करण्यात आले ,पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांनी यावेळी नागरिकांना आवाहन करून सोशल डिस्टन्सींग पाळावे, विना मास्क फिरू नये व भाजी व फळविक्रेत्यांनी ठरवून दिलेल्या जागेतच व्यवसाय करण्यासंबंधी आवाहन केले तसेच नियमभंग करेल त्यांच्यावर आता ठोस कारवाई करण्याचा इशारा दिला.

प्रदीप साबळे – नगराध्यक्ष बदनापूर
कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे,कोरोना हा गंभीर आजार असून नागरिकांनी स्वतःचे रक्षण स्वतः करणे गरजेचे आहे,प्रशासन व शासन यांनी वेळोवेळी घराबाहेर निघतांना मास्क,सिनेटाझर चा वापर करण्याची सूचना दिलेली असतांना काही मंडळी गांभीर्याने घेत नसल्याने पोलीस व नगर पंच्यात ला मास्क न वापरणाऱ्या विरुद्ध दंडांत्मक कारवाई करावी लागत आहे,नागरिकांनी नियमांचे उल्लंघन न करता मास्क व सिनेटायझरचा वापर करून प्राशासनास सहकार्य करावे .

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!