Home विदर्भ आरोग्य विभागाचा उपक्रम – आपले आरोग्य – आपल्या हाती.

आरोग्य विभागाचा उपक्रम – आपले आरोग्य – आपल्या हाती.

209

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

हुसनापूर येथे हिवताप डेंग्यू जनजागरण महिला सभा.!

हिवताप डेंग्यू आजारावर मात करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा – दिलीप उटाणे

वर्धा – प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ उपकेंद्र हुसनापूर च्यावतिने जून महिना हिवताप प्रतिरोध अंतर्गत हुसनापूर येथे आज १६ जून रोजी हिवताप डेंग्यू जनजागरण महिला सभा आरोग्य सहाय्यक सविता फरताडे यांच्या आरोग्य सेवक दिलीप सामाजिक कार्यकर्त्यां संध्या मिश्र! माधव कातकडे आरोग्य सेविका वृंदा घोडमारे कविता झाडे गणेश चंदेल यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

१ जून ते ३० जून हिवताप प्रतिरोध महिना शासनाने जाहीर केला असून या काळात आरोग्य कर्मचारी रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा हिवताप दिंडी .असे विविध कार्यक्रम घेवून हिवताप व डेंग्यू जनजागरण दरवर्षी करीत असतात परंतु राज्यात कोरोणाचा प्रादुर्भाव असल्यामुळे छोटेखानी महिला सभा घेत आहोत हिवताप व डेग्यू हा आजार मानवनिर्मित आहे कारण घरातील वापरायच्या पाण्याच्या भांडीत डास निर्माण होतात .त्यामुळे हिवताप डेग्यू आजारावर मात करण्यासाठी नागरीकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी केले.
डेंग्यू आजार नियंत्रणासाठी कंटेनर सर्व्हेक्षण प्रत्येक गावात ग्राम पंचायत यांच्या सहकार्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी गृहभेटी मार्फत एडीस डास असलेली दुषीत भांडी शोध घेवून कुटूंबाना दुषीत भांडी असल्याचे परिणाम सांगावे असे वर्धा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार. जिल्हा परिषद वर्धा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओम्बासे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले .जिल्हा हिवताप अधिकारी जयश्री थोटे तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रविण धमाने यांनी केलेल्या आवाहनानुसार .प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ उपकेंद्र हुसनापूर च्यावतिने विविध कार्यक्रम घेवून जनजागरण करण्यात येत आहे
भिडी रत्नापूर वाबगाव कोल्हापूर पूर (राव) येथे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्य पथका व्दारे दुषीत डास भांडी शोध मोहिम करुन काही दुषीत भांडी रिकामे करण्यात आले तर काही दुषीत भांड्यात टेमिफास टाकण्यात आले.
साथरोग प्रतिबंधक उपाय म्हणून हिवताप डेंग्यू डेंग्यू आजारावर मात करण्यासाठी ग्राम पंचायतने पुढाकार घेवून काम करण्याची गरज आहे अशा संदेश पाठवून आवाहन वर्धा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले.
पावसाळ्यात होणारे व आजार व उपाय यावर महिलांशी संवाद साधताना आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी डेंग्यू आजारावर मात करण्यासाठी महिलाच्या सहकार्याची गरज आहे , असे प्रतिपादन केले.
पिण्याचा पाणी किंवा घरगुती वापरायचे पाणी असो महिलांचा पाण्या सोबत जास्त संबध येतो
डेंग्यू . हिवताप सारखे आजार हे मानव निर्मीत आहेत .वारंवार आरोग्य कर्मचारी सुचना करतात त्याकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे आजार होतात.
हा डास वापराच्या शुद्ध पाण्यातच तयार होतो .घरातील वापरायची भांडी धुवून पुसून आठवड्यातून एकदा कोरडी केल्यास डास उत्पत्ती होणार नाही तसेच घराभोवती फुटलेली डंबे नारळाच्या करवाटी प्लास्टिक कप इत्यादी वस्तूची योग्य विल्हेवाट लावावे .जेणे करुन त्यात पाणी साचनार नाही त्यामुळे डेंग्यू आजारावर आळा बसेल आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सुचनेचे पालन केल्यास आपले घरच नव्हे आपल गाव हिलताप डेंग्यू मुक्त होईल. म्हणूनच आरोग्य कर्मचारी डेंग्यू जनजागरण करीत आहे .

एक दिवस एक कार्यक्रम वेगवेगळे उपक्रम करुन जनतेला माहिती द्यावे अशी सुचना वर्धा जिल्हाधिकारी मा.विवेक भिमनवार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिलेल्या आहे .ते स्वतः याचा आढावा घेत आहेत.

संपुर्ण जिल्हात राष्ट्रीय किटकजन्य व जलजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत आरोग्य कर्मचारी गावा गावात विविध कार्यक्रमा व्दारे जनजागरण करीत आहे.

उटाणे पुढे म्हणाले डेंग्यू तापावर आळा घालण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे काळाची गरज आहे हिवताप . डेंग्यू तापापासून बचाव आपली सर्वाची जबाबदारी आहे.आपल्या माहित असलेले उपाय इतरांना सांगा .झोपताना मच्छदानीचा वापर करा.डेंग्यूचा डास दिवसा चावतो .तिव ताप झटके गोवर सारखे अंगावर पुरळ डोकेदुखी अंगदुखी सांधेदुखी डोळे लाल येणे रक्तदाब कमी होणे इत्यादी लक्षणे आढळून आल्यास वेळीच नजीकच्या दवाखान्यात न्यावे .विलंब झाल्यास मृत्यू ओढवू शकतो .घरा भोवतालचा परिसर स्वच्छ करावा..साचलेल्या पाण्यात राकेल किंवा कुड आँईल टाकण्यात यावा.घरातील तुटलेली फुटलेली भांडी अनुपयोगी टायर्स प्लास्टिक कपासारखे वस्तूची योग्य विल्हेवाट तसेच छतावर टाकलेल्या अळगळीच्या सामानाची योग्य विल्हेवाट लावन्यात यावी असे सविस्तर मार्गदर्शन आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी केली .
सभेचे प्रास्तविक आरोग्य सेवक माधव कातकडे यांनी तर संचालन वृंदा घोडमारे आभार आशा वर्कर कुसूम नाल्हे यांनी केले
गावातील महिताची उपस्थिती होती.