
मनिष गुडधे
अमरावती – भातकुली मार्गावर असलेल्या निंभा शेत शिवारात काही शिकारी कुत्र्यांनी हरणाच्या पाडसा वर प्राणघातक हल्ला केला. जंगली कुत्रांनी हरणाच्या पाडसाचे लचके तोडण्यास सुरवात केली, तेथे जवळच असलेल्या काही शेतात काम करणाऱ्या लोकांनी त्या शिकारी कुत्र्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला ,


मात्र शिकारी कुत्र्यांनी शेतात काम करणाऱ्या लोकांवर सुद्धा हल्ला करायचा प्रयत्न केल्या त्यामुळे भयभीत झालेल्या शेतकऱ्यांनी सदर घटनेची माहिती युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्राच्या टीमला दिली.युवा लॉयन्स ग्रुप ची टीम क्षणाचाही विलंब न करता तात्काळ घटनास्थळावर पोहचली. त्या शिकारी कुत्र्यांना हाकलून लावून त्या पडसाला आपल्या ताब्यात घेतले. हरणाचे पाडस गंभीर रित्या जखमी असल्यामुळे वनविभागाला संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली. व घटनास्थळी बोलावून घेतले .वनविभाग आणि युवा लॉयन्स ग्रुपच्या निर्भीड व समयसूचकते मुळे भयभीत झालेल्या पडसाचे प्राण वाचले. यावेळी घटनास्थळी युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्राचे संस्थापक मा. पै.अध्यक्ष योगेश भाऊ गुडधे तसेच प्रथमेश वाजपे ,आशुतोष भाऊ खंडारे , प्रशांत भाऊ शिरसाठ ,पवन भाऊ हिवराळे, राकेश भाऊ गुडधे ,इमरान शाह ,शाहरूख भाई, प्रफुल कोकाटे, तसेच वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.










































