Home मराठवाडा गेवराई येथील समाजसेवक अन्सारी परिवाराच्या वतीने रोग प्रतिकारक शक्ती च्या असेंनीक अल्बम...

गेवराई येथील समाजसेवक अन्सारी परिवाराच्या वतीने रोग प्रतिकारक शक्ती च्या असेंनीक अल्बम गोळ्या वाटप , 80 हजार नागरिकांना लाभ मिळणार

125

अमीन शाह

बीड :- कोरोना महामारीमुळे देश हादरून गेलेला आहे अश्या कठीण परिस्थतीमध्ये अनेक दानशूर व समाजसेवक पुढे येऊन जनतेच्या आरोग्याची काळजी घेत असून गेवराई येथील समाजसेवक अन्सारी एस वाय अन्सारी यांची डॉ.कन्या शेख आस्मा अन्सारी ह्याआपणास समाजाचे काही देणे लागते या हेतूने पुढे आल्या असून त्यांनी माणसांच्या शहरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या आसेनिक अल्बम च्या गोळ्या बनविल्या आहेत,सदर गोळ्यांचे आठ हजार पॉकेट बनविण्यात आले असून त्या गरजूना मोफत वाटप करण्यात येत आहे या गोळ्यांची गोळ्यांचे वाटप १० जून पासून सुरु करण्यात आले असून याची सुरवात समाजातील महत्वाचा घटक समजल्या जाणार्या पत्रकारापासून करण्यात आली
बीड जिल्ह्यातील गेवराई येथील समाजसेवक एस वाय अन्सारी यांची कन्या डॉ.आस्मा तजिन अन्सारी वैधकीय क्षेत्रातील बी एच एम एस पदवीधारक आहे त्यांनी कोरोना महामारीमुळे संकटात सापडलेल्या गरजू लोकांसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी आसेनिक अल्बम गोळ्या बनविल्या आहेत ,सदर गोळ्या बाजारात खूप जास्त किमतीने विकल्या जातात ,आसेनिक अल्बम ह्या गोळ्या कोरोना रोगाच्या नसल्या तरी या गोळ्यामुळे माणसांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे काही प्रमाणात कोरोना रोगापासून बचाव होतो,बाजारात किमती जास्त असल्याने सामान्य गोर गरीब यांना गोळ्या खरेदी करणे शक्य नसल्याने डॉ.आस्मा तजिन अन्सारी यांनी गरजूना मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन आठ हजार पॉकेट बनविले आहे
डॉ.आस्मा तजिन अन्सारी यांनी गेवराई शहरातील गरजूना आसेनिक अल्बम च्या गोळ्या वाटपास १० जून पासून सुरवात केली असून प्रथम समाजातील महत्वाचा घटक समजल्या जाणाऱ्या पत्रकरांना गोळ्या वाटप करण्यात आले यावेळी गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर,संतोष भोसले,अयुब बागवान,सुभाष सुतार,गणेश क्षीरसागर,जुनेद बागवान,भागवत जाधव,प्रसाद कुलकर्णी,ढाकणे मामा आदी उपस्थित होते

डॉ. आस्मा तजिन अन्सारी – गेवराई
कोरोना महामारीमुळे मोठे संकट आपल्यासमोर उभे आहेत शासन व प्रशासन आपल्या परीने कोरोना रोगावर मात करण्यासाठी आहोरात्र परिश्रम घेत असून पोलीस,आरोग्य विभागासह पत्रकार देखील जनजागृतीचे काम करीत आहे,कोरोना रोगापासून बचाव करण्यासाठी शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती आवश्यक असल्याने आसेनिक अल्बम च्या गोळ्या महत्वपूर्ण आहे आणि सदर गोळ्या बाजारातून गोर गरिबांना खरेदी करणे शक्य नाही म्हणून मी आठ हजार गोळ्यांचे पॉकेट बनविले असून गरजूना मोफत वाटप करीत आहे तसेच आवश्यकता भासल्यास मोफत चेकअप करण्यास तय्यार आहे.