July 9, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

कोरोना म्हणजे जागतिक भूकंप….!

लातूर :- 30 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारी (लातूर) गावात भूकंप झाला होता पण त्यावेळेपर्यंत जगाला भूकंपाची तीव्रता काय असते ते माहीत नव्हते अख्खे कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झाले हजारो माणसे एका क्षणात मृत्युमुखी पडली कोरोनासुद्धा भूकंपासारख्या तीव्रतेने जगाला आपल्या विळख्यात घेत आहे अमेरिका इटली सारखे देशसुद्धा या रोगापुढे हतबल झाले आहेत दररोज हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत हा एक प्रकारचा जागतिक भूकंपच आहे.
या रोगावर सध्या कायमस्वरूपी इलाज नाही त्यामुळे यात शारीरिक अंतर ठेवणे वारंवार हात धुणे मास्क वापरणे या गोष्टींचा आपण अवलंब करून सुरक्षित राहू शकतो जर एखाद्या कुटुंबात याची लागण झाली तर ती सर्वांना लागण होत आहे यातून तंदुरुस्त ही मोठ्या प्रमाणात रुग्ण होत आहेत पण यावर कायमस्वरूपी लस निघणे गरजेचे आहे आज करोडो लोक या रोगाच्या दहशतीत व सावटाखाली आहेत रोजगार नसल्याने गोरगरिबांचे हाल होत आहेत डॉक्टर नर्स आरोग्य कर्मचारी यांच्यावर ताण वाढत आहे आता ह्या रोगाची तीव्रता कमी करणे गरजेचे आहे व लोकांना चांगला संदेश देऊन सर्व सरकारी सूचनांचे पालन करून जनजीवन पूर्वपदावर आणणे गरजेचे आहे.
भूकंप हा एका क्षणात येऊन गेला पण कोरोनाचे तसे नाही हा संसर्गजन्य रोग असल्याने तो टप्याटप्याने सर्वांना आपल्या सावटाखाली घेतो या कोरोनाला हारविण्यासाठी येणाऱ्या काळात आपल्या भारत देशातील व महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्क राहून सर्व नियमांचे पालन करून जास्त गर्दी कोठेही न करता नियोजनबद्ध पद्धतीने वागावे लागेल भविष्यात लग्नसोहळे असो वा कोणतेही कार्यक्रम सणवार कमीतकमी लोकांना घेऊन करावे लागतील जेणेकरून गर्दी होऊ नये व कोरोनाचा प्रसार होऊ नये आता आपण सर्व नागरिकांनी हे लक्षात ठेवून कोरोनाला थांबविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे कोरोनाला हारविण्यासाठी कडकशिस्त नियोजन सुसूत्रता अंमलबजावणी या सर्व गोष्टींचा वापर करून या भूकंपरुपी कोरोनाला हरविणे गरजेचे आहे यामध्ये सर्व शासकीय कर्मचारी जीवाची बाजी लावत आहेत त्यामध्ये पोलीस आरोग्य कर्मचारी व सर्व शासकीय यंत्रणा इत्यादी आता लोकांना याची तीव्रता समजली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सूचनांचे पालन करुन आपली दैनंदिन वाटचाल करावी लागणार आहे.
कोरोना हा संसर्गजन्य रोग लवकर आटोक्यात येईल असे वाटत नाही पण त्यावर अंकुश नक्कीच ठेऊ शकतो व या रोगासोबत जगणं शिकलं पाहिजे त्यामुळे तो आपल्याला आटोक्यात आणता येईल व हळूहळू तो संपवता येईल या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
कोरोनाला गंभीरपणे व संयमपणा दाखवून आटोक्यात आणून याचा नायनाट करणे गरजेचे आहे कोरोना हा भूकंपाइतकाच तीव्रतेचा आहे यात भूकंप अचानक न सांगता येऊन सर्वकाही उध्वस्त करतो व कोरोना हा टप्प्याटप्प्याने करतो हा इतकाच फरक आहे याला रोखणे गरजेचे आहे भूकंपाला आपण रोखू शकत नाही कोरोनाला आपण रोखू शकतो म्हणून सर्वकाही आपल्या हातात आहे.

“परेशानियो से भागना आसान होता है,
हर मुश्किल जिंदगी में एक इम्तिहान होता है,
हिंमत हारनेवाले को कुछ नही मिलता जिंदगी मे, और मुश्किलो से लडनेवाले के कदमो में ही तो सारा जहाँ होता है……..

लेखन-

श्री. विनय शेलुरे / श्री. राहुल भोसले

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!