Home विदर्भ अवैधरित्या दारु वाहतुक करणार्या दोघांना अटक , वाहनासह ४ लाख १२ हजार...

अवैधरित्या दारु वाहतुक करणार्या दोघांना अटक , वाहनासह ४ लाख १२ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त…!

187

स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कार्यवाही….!

रवि माळवी

यवतमाळ – चारचाकी वाहनातून दोघेजण देशीदारुचे पव्वे विक्रीकरीता घेवून जात असतांना स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने त्यांना अटक करुन एकुण ४ लाख १२ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीसांनी ही कारवाई दिनांक १० जुन रोजी वणी येथील दिपक टॉकीज जवळील गोकुळ नगर परीसरात केली.
सुरेश नग्बु टेकाम (२७), सुभाष प्रकाश शिंदे (२४) दोघेही रा.रासा असे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दिनांक १० जुन रोजीस्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार व त्यांचे पथक अवैध धंद्यांविरुध्द कार्यवाही व गुन्हेगार शोध कामी वणी परिसरात हजर असतांना त्यांचे पथकाला मिळालेल्या गोपणीय माहितीवरुन सुभाष शिंदे नावाचा ईसम त्याचे शर्वेलेट गाडी क्र. एम.एच.०२ बि.जी. ८७३३ ने गोकुळनगर परिसरातुन देशी दारुचा माल घेवून दिपक टॉकीज- दिपक चौपाटी मार्गे रासा येथे जाणार आहे. अशा विश्वसननिय माहितीवरुन पोलीस उपनिरीक्षक जिंदमवार व पथकाने पंचासह माहीतीची खातरजमा करणे करीता रवाना होवून दिपक टॉकीज परिसरात सापळा रचुन गोकुळ नगर परिसरातुन दिपक टॉकीज चौकाच्या दिशेने माहीतीप्रमाणे येणार्या शर्वेलेट गाडी ला पोलीस स्टाप चे मदतीने थांबवुन पाहणी केली असता वाहनात चालक सुरेश टेकाम व त्याचे सोबतचा सुभाष शिंदे असे दोघे आढळुन आल्याने प्राप्त माहितीची खात्री करण्याकरीता पंचासमक्ष त्यांचे ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता वाहनाचे पाठीमागील डिक्कीमध्ये देशी दारुने भरलेले पुठ्ठयाचे ५ बॉक्स ज्यामध्ये १८० एम.एल.क्षमतेच्या २४० बॉटल एकुण किंमत १२ हजार ४८० रुपयाच्या आढळुन आल्याने सदरची दारु व वाहन किंमत ४ लाख रुपयाची असा एकुण ४ लाख १२ हजार ४८० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुध्द वणी पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक एम.राज कुमार, अपर पोलीस अधिक्षक नूरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोना.गजानन डोंगरे, उल्हास कुरकुटे, किशोर झेंडेकर, दत्ता दुमारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच वणी पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार विठ्ठल भुरेवार यांनी पार पाडली.