Home सातारा फायनान्स कंपन्यांनी कर्ज माफी करावी – रिपाई गणेश भोसले

फायनान्स कंपन्यांनी कर्ज माफी करावी – रिपाई गणेश भोसले

190

मायणी – सतीश डोंगरे

सातारा – फायनान्स कंपन्यांकडून महिलांना व इतर लोकांना देण्यात आलेली कर्ज वसुली तात्काळ थांबवून माफ करण्यात यावीत, तसेच महिलांना त्रास देऊ नये असे निवेदनामार्फत (रिपाई) आठवले गटाचे मा.नेते गणेश भोसले यांच्या कडून इशारा देण्यात आला आहे
खटाव तालुक्यामध्ये विविध प्रकारच्या फायनान्स कंपन्या आहेत. त्यामध्ये भारत फायनान्स कंपनी वडूज, ग्रामीण कुटा फायनान्स कंपनी वडूज, मान देशी महिला बँक वडूज, न्यू सातारा सहकारी पतसंस्था पुसेगाव, बजाज फायनान्स वडूज, श्रीराम फायनान्स वडूज, फिनो फायनान्स कोरेगाव, चैतन्य फायनान्स कोरेगाव, या सर्व फायनान्स कंपन्या तालुक्यात आहेत. त्या फायनान्स कंपन्यांनी तालुक्यातील छोटी-मोठी गावे, वाडी, वस्ती वर मोठ्या प्रमाणात गोरगरीब महिला, विधवा, अपंग महिला, मजुर महिला, कष्टकरी महिला, व इतर या सर्वांना छोटे-छोटे समूह गट तयार करून या सर्व महिलांना व इतर लोकांना कर्ज वाटप केले आहे. सध्या देशामध्ये कोरानाने थैमान घातले असून, मा. पंतप्रधान मोदीजी यांनी लोक डाऊन जाहीर केले आहे. तसेच रिझर्व बँक ऑफ इंडियाने देखील या सर्व फायनान्स कंपन्यांना कर्ज वसुली व दंड आकारण्यात येऊ नयेत असे आदेश दिले आहेत. तरीसुद्धा या फायनान्स कंपन्या व त्यांचे एजंट यांचेकडून महिलांना दमदाटी अर्वाच्य भाषेत बोलले आहेत. मोबाईलवर फोन करून महिलांना व इतर लोकांना मानसिक त्रास देत आहेत. आता महिलांना आपल्या मुलाबाळांचे पोट भरणे मुश्किल झाले आहेत. अशा परिस्थितीत ह्या फायनान्स कंपन्या त्यांचे आर्थिक शोषण करत आहेत. मा.तहसीलदार साहेब आपण लक्ष घालून या महिला व इतर लोकांवर होणाऱ्या आर्थिक तसेच त्या महिला व इतर लोकांचे कर्ज माफ करण्यात यावे. त्या फायनान्स कंपन्यांना तात्काळ आदेश देऊन कर्जवसुली थांबून ती माफ करण्यात यावी. अन्यथा या महिला व इतर लोकांसाठी रिपाई (आठवले गट) च्या वतीने संबंधित फायनान्स कंपनी विरोधात लोक डाऊन मध्ये कायदा हातात घेऊन संबंधित फायनान्स कंपनीचे ऑफिस ची तोडफोड करु.
याबाबत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन महिलांना व इतर लोकांना त्रासातून मुक्त करावे. यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची राहील असे निवेदनात नमूद करणयात आले आहे . यावेळी निवेदन देताना अजित नलवडे,गणेश भोसले,संदीप काळे, विशाल कांबळे व प्रकाश बनसोडे उपस्थित होते.