Home सातारा मल्हारपेठ पंढरपूर राज्यमार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवड

मल्हारपेठ पंढरपूर राज्यमार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवड

239

मायणी ते दिघंजी ४७ किमीचा महामार्ग होणार हरित

मायणी – सतीश डोंगरे

सातारा – मल्हारपेठ – पंढरपूर राज्य महामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे . या कामाच्या सुरवातीस रास्ता रुंदीकरणात अनेक वृक्षांची तोड करण्यात आली होती. सध्या काही अपवाद वगळता पूर्णत्वाकडे असणाऱ्या या महामार्गच्या मायणी ते दिगंजी या ४७ किलोमीटर अंतरापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाचा प्रारंभ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखुन मायणी येथे करण्यात आला.

या वृक्षारोपनामुळे मल्हारपेठ पंढरपूर राज्य मार्ग पूर्वीप्रमाणे किंबहुना त्याहूनही जास्त हिरवा गाव व सावलीत असणारा आपणास दिसणार आहे. चिपळुण या कोकण भागातून सध्या पंढरपूर ला जाणार हा अत्यंत जवळचा मार्ग असून सध्या नव्याने बांधणी करण्यात आलेला महामार्ग व दुतर्फा वनराई यामुळे प्रवाशांना हा मार्ग निसर्ग वातावरणातून नेणारा ठरणार आहे.

याबाबत यावृक्षलागवड करणाऱ्या ठेकेदाराने दिलेल्या माहिती प्रमाणे, एकूण मायणी ते दिघंजी या ४७ किलोमीटरच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे.या उपक्रमांतर्गत करवंज, लिंबू, निलगिरी, पिंपरी ,गुलमोहर आधी झाडांची रोपे रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला १० मीटर अंतरावर व दोन्ही वृक्षांमध्ये सात मीटर अंतर ठेवून वृक्षलागवड करण्यात येणार आहे.

या वृक्षलागवड प्रारंभ प्रसंगी माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, सरपंच सचिन गुदगे,उपसरपंच आनंदराव शेवाळे,माजी उपसरपंच सुरज पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजय कवडे, जगन्नाथ भिसे, नितीन झोडगे , संजयकुमार देशमुख,सरुताई देवस्थान सचिव रवींद्र बाबर राजाराम कचरे, संजय जाविर,जउपस्थित होते .