
तसेच गरजूंना राशन किटचे वाटप करण्यात आले…!
औरंगाबाद , ( प्रतिनिधी ) :- नुरकॉलनी टाऊनहॉल हे परिसर कोरोना मुक्त झाला आहे. 26 एप्रिल रोजी येथे कोरोना पेंशट मिळून आल्याने या परिसरात खळबळ उडाली होती. ह्या परिसर पूर्ण सिल करण्यात आले होते. सिल झाल्यापासून येथील समाजसेवक मुख्तार खान बब्बू भाई यांनी लोकांना मदत करण्यास सुरवात केली होती.
नुरकॉलनी टाऊनहॉल येथे पोलीस बंदोबस्त होता. सतत पोलीस आपले कर्तव्ये पारपाडीत होते. शासन व एनजीओ व मुख्तार खान बब्बू भाईच्या वतिने येथील नागरीकांना राशन किट व जीवनावश्यक वस्तू नागरिकांना पुरवत होते तसेच हे परिसर आता औरंगाबाद मुक्त झाल्या आहे म्हणून समाजसेवक मुक्तार खान यांनी पोलिसांनी सतत आपले कर्तव्य पार पाडीत येथील नागरिकांची सेवा केली म्हणून आज मुक्तार खान यांच्या वतीने नायब तहसीलदार शिंदे तसेच सिटीचौक पोलिस ठाण्याचे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले, समाजसेवक मुख्तार खान बब्बू याने सांगितलं खरे अर्थाने कोरोना योद्धा पोलीस आहेत. आपल्या परिवाराला सोडून स्वतः 24 तास या परिसरात आपली ड्युटी पाणीच होते यामुळे त्यांच्या सत्कार सन्मान झाल्याच पाहिजे सर्व नुरकॉलनी टाऊनहॉल कॉलनी नागरिकांच्या वतीने पोलिसांच्या सत्कार करण्यात आला आहे. यावेळी मुख्तार खान सोबत त्यांची टिम सोबत खंबीरपणे उभी होती.











































