Home नांदेड पालाईगुडा येथील युवकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह! तालुका प्रशासन पोहोचले पालाई गुडयात ,...

पालाईगुडा येथील युवकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह! तालुका प्रशासन पोहोचले पालाई गुडयात , “कंटेंटमेन्ट झोन जाहीर”

180

मजहर शेख

नांदेड / माहूर , दि. ०५ :- माहूर तालुक्यातील मालवाडा वडसा येथील कोरूना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाल्यानंतर माहूर तालुक्यासाठी धक्कादायक बातमी माहूर पॉईंट सेंटरमधून आली असून मुंबई येथे बेस्ट मध्ये नोकरीस असलेला गावाकडे परतलेला एक युवक थॉट स्वाब रिपोर्ट कोरोना पॉझिटिव आला आहे. सदर युवक 31 मे रोजी मुंबई येथून या गावी पालाईगुडा येथे परतला होता त्याला ताप आल्याचे दिसुन आल्याने माजी सभापती शरद राठोड यांनी दिनांक 4 रोजी तपासणीसाठी माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले. वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्ही.एन भोसले यांनी सदर युवकाचा थ्रोट स्वेब घेऊन तपासणीसाठी पाठविला होता दिनांक पाच जून रोजी 11: 24 वाजता सदर रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यामुळे माहूर येथील कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या तीन वर पोहोचली असून यापूर्वीच दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

असे असले तरी प्रशासन सदर युवकाचा रिपोर्ट आल्यानंतर तब्बल तीन तास उशिरा गावात पोहचले. त्यापूर्वी सर्वात आधी काही पत्रकार गावात पोहोचून त्यांनी गटविकास अधिकारी विशाल सिंह चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भिसे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर तब्बल अडीच तास उशिरा आरोग्य पथक, तालुका प्रशासन पालाईगुंड्यात पोहोचले. त्यापूर्वी ग्रामसेवक श्रीमती सुदेवार व सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांनी गावाच्या सीम बंद करण्याची तयारी केली होती, तब्बल अडीच तासानंतर तालुका प्रशासन गावात पोहोचून कंटेंट मेंट झोन घोषित केल्याची माहिती आहे.