Home मराठवाडा जालन्यात डबल सीट दुचाकीवर फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई…

जालन्यात डबल सीट दुचाकीवर फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई…

110

लक्ष्मण बिलोरे

जालना – लाॅकडाऊन काळात सर्रासपणे शहरात रपेट मारणे तसेच दुचाकीवर डबलसीट खरेदीसाठी बाहेर पडणे मंगळवारी (ता.2) शेकडो जालनेकरांना महागात पडले आहे. कारण डबलसीट दिसणाऱ्या शेकडो दुचाकी जप्त करुन पोलीसांनी त्यांच्यावर कारवायांचा बडगा उगारला आहे. जालना शहरातील तालुका पोलीस ठाणे व सदर बाजार पोलीस ठाणे पोलीसांनी मोठ्या प्रमाणात कारवाया करुन अनेक दुचाकी जप्त केल्या आहेत.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी एका दुचाकीवर एकच व्यक्तीने प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. तर तीन व चार चाकी वाहनांनी चालक व दोन प्रवासी अशी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, तरी अनेकांकडून या नियमांची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे मंगळवारी (ता.2) सकाळी सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी आपल्या पथकासह शहरातील मामा चौक येथे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शेकडो दुचाकी जप्त केल्या आहेत. या सर्व दुचाकी मालक यांच्यावर गुन्हा दाखल केले असुन शहरातील तालुका जालना पोलीस ठाणे व सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत पोलीस निरीक्षक संजय लोहकरे व पोलीय निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाया करण्यात आल्या.