Home विदर्भ शेतकऱ्यांनो सोयाबीन पेरणी रुंद वरंबासरी पध्दतीने करा .

शेतकऱ्यांनो सोयाबीन पेरणी रुंद वरंबासरी पध्दतीने करा .

417

काजळेश्वर येथील शेतकरी कार्यशाळेत कृषी मंडळ अधीकारी संतोष चौधरी यांनी दिला शेतकऱ्यांना कृषीविषयक सल्ला

प्रतिनिधि – आरिफ़ पोपटे

वाशिम / कारंजा – तालुक्यातील काजळेश्वर उपाध्ये : सततच्या होत असलेल्या हवामान बदलामुळे सोयाबीन पीक संकटात सापडत आहे .पीकाच्या वाढीच्या व पक्यतेच्या काळात पाऊस जास्त होणे किवा कमी होणे ‘ खंड पडणे ‘ जमीणीचा ओलावा कमी होणे इत्यादी कारणांमध्ये पीकाऱ्या उत्पन्नात घट येते किवा पीक वाया जाते यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी रूंद वरंबा सरी या पद्धतीने शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी करण्याचा सल्ला कृषी मंडळ अधीकारी संतोष चौधरी यांनी शेतकरी कार्यशाळेत काजळेश्वर येथे
दि .२९ मे रोजी दिला आहे .
रुंद वरंबा सरी बी.बी. एफ . तंत्रज्ञाना बाबत बोलतांना कृषी मंडळ अधिकारी संतोष चौधरी म्हणाले की खरीप हंगामामध्ये घेतल्या जाणार्‍या मुख्य पिकांपैकी सोयाबीन हे एक महत्वाचे शेंगवर्गीय व गळीत पीक आहे. मध्यम ते भारी प्रकारची जमीन व वार्षिक पर्जन्यमान 750 ते 1000 मि.मी. सारख्या प्रमाणात विखुरलेले असल्यास हे पीक चांगले येते. खरीप हंगाम सुरू झाल्यावर मान्सून वाऱ्यापासून पावसाची सुरवात झाल्यावर १००ते १५० मी.मी. पाऊस झाल्यावर सोयाबीनची पेरणी केली जाते . अशा वेळी पीकाला पाण्याच्या ताणापासून वाचविण्याकरीता बीबीएफ तंत्रज्ञान
शेतकऱ्यांनी अवलंबावे असा कृषी विषयक सल्ला कृषी मंडळ अधीक्षरी यांनी शेतकऱ्यांना दिला . कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यास कृषी विभाग कारंजाचे संतोष चौधरी यांचे सह कृषी सहाय्यक कैलास पाटील घाडगे ;चंदन राठोड ;राम मार्गे उपस्थिता होते . कार्यशाळा सधन शेतकरी तुळशीराम पा . उपाध्ये यां ले अध्यक्षतेखाली घेण्यात आली .सभेचे संचलन कैलास पाटील घाडगे यांनी तर आभार प्रदर्शन चंदन राठोड यांनी पार पाडले शेतकऱ्यांनी कार्यशाळेत उपसस्थीती दिली .