Home विदर्भ 3 वर्षाच्या भाग्येश सहित 5 रुग्णांची कोरोनावर मात.!

3 वर्षाच्या भाग्येश सहित 5 रुग्णांची कोरोनावर मात.!

112

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

टाळ्या वाजवून दिला निरोप…!

वर्धा – नवी मुंबईतील 3 वर्षाचा चिमुकला भाग्येश त्याची आई व काका आणि अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील आई व मुलगी अशा एकूण 5 व्यक्तीनी आज कोरोनावर मात केल्यामुळे पाचही रुग्णांना घरी सोडण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या सोबत डॉक्टरांनी टाळ्या वाजवून रुग्णांना निरोप दिला आणि निरोगी राहण्याच्या शुभेच्छा दिल्यात.

नवी मुंबईतून आर्वी तालुक्यातील जामखुटा येथे आलेल्या तीन व्यक्तीना कोरोनाची लागण झाल्यामुळे सेवाग्राम येथील कोविड रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. त्यांच्यासोबत तीन वर्षांचा चिमुकला भाग्येशही कोरोनाबाधित होता. त्यांच्यावर 14 दिवस उपचार केल्यावर त्यांची दुसरी चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. मात्र पुन्हा दुसऱ्या दिवशी करण्यात आलेल्या चाचणीत ते कोरोनामुक्त झाल्याचा अहवाल मिळाला. त्यामुळे आज त्यांना टाळ्या वाजवून निरोप देण्यात आला.
सावंगी मेघे येथील विनोबा भावे रुग्णालयात अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव तालुक्यातील मेंदूज्वराच्या आजारासाठी दाखल झालेल्या तरुणीसोबत तिच्या दोन बहिणी व आई सुद्धा कोरोनाबाधित झाले होते. त्यापैकी आई आणि एका बहिणीचा अहवाल 14 दिवसानंतर कोरोना करिता निगेटिव्ह आल्यामुळे त्यांनाही आज घरी सोडण्यात आले. यावेळी सावंगी येथे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ बसवराज तेली, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, सावंगी मेघे रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ अभ्युदय मेघे, रुग्णालयातील डॉक्टर यांनी बऱ्या झालेल्या रुग्णाला प्रमाणपत्र आणि शुभेच्छापत्र देऊन निरोगी राहण्याच्या शुभेच्छा दिल्यात.
उपचार करणाऱ्या डॉक्टरांमध्ये सावंगी येथील डॉ संदीप श्रीवास्तव, ललित वाघमारे, चंद्रशेखर महाकाळकर, सुनिल कुमार, हेमंत देशपांडे, विठ्ठल शिंदे, माधुरी ढोरे इत्यादी डॉक्टरांचा समावेश आहे.
यावेळी इतर अधिकारी, डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.