Home विदर्भ हिंदुस्तानी दुर्गादेवी उत्सव मंडळाच्या वतीने पोलिस बांधवांसाठी 71 हजार रूपयांची देणगी

हिंदुस्तानी दुर्गादेवी उत्सव मंडळाच्या वतीने पोलिस बांधवांसाठी 71 हजार रूपयांची देणगी

285

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. २९ :- कोरोना संसर्ग महामारीच्या दरम्यान काटेकोरपणे जबाबदारी पार पाडणार्‍या यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस बांधवांच्या कल्याणासाठी हिंदुस्थानी दुर्गादेवी उत्सव मंडळ आठवडी बाजार यवतमाळच्या वतीने आज पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांना 71 हजार रूपयांचा धनादेश मंडळाचे जेष्ठ सदस्य संजय त्रिवेदी, मनोज जयस्वाल, अशोक मुराब यांनी सुपुर्द केला. या प्रसंगी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रदिप शिरस्कर, मोटर परिवहन विभागाचे निरीक्षक राजेंद्र जाधव, पोलिस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी आदि प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी मागील दोन महिन्यांपासुन पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासनाने यवतमाळ जिल्ह्यात लॉकडाऊन दरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित रित्या पार पाडली. त्याबद्दली हिंदुस्थानी दुर्गादेवी उत्सव मंडळाच्या वतीने पोलिस विभागाचे व पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांचे अभिनंदन याप्रसंगी करण्यात आले.