July 9, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

राज्याचे गृहमंत्री मा.ना अनिल देशमुख साहेब यांची अ.गफ्फार मलिक यांच्या घरी ईद निमित्त सदिच्छा भेट

प्रतिनिधी – लियाकत शाह

जळगाव – आपल्या देशात सामाजिक सदभावना जोपासण्याची परंपरा प्राचीन काळा पासून दिसून येते. विविध जाती धर्मातील समाज गुणगोविंदाने येथे राहत आलेला आहे. दूसऱ्या समाजाच्या आनंद उत्सवात सहभागी होण्याची परंपरा अविरत पणे सुरु आहे.

ज्या प्रमाणे मुस्लिम समाज दिवाळी सारख्या सणात हिंदू समाजाच्या सण उत्सावात सहभागी होतो त्याच प्रमाणे मुस्लिमांच्या ईदोत्सावात ही इतर समाज सहभागी होऊन आनंदाच्या क्षणात सहभाग नोंदवतो. महाराष्ट्राची ही उज्जवल परंपरा आबाधित राखत राज्याचे गृहमंत्री यांनी शनीपेठ येथे महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अ.गफ्फार मलिक यांच्या निवासस्थानी भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या व ईद निमित्ताने तयार केल्या जाणाऱ्या शिरखुर्माचा आस्वादही घेतला. या वेळी उपस्थित माजी मंत्री गुलाबराव देवकर आप्पा साहेब, आमदार अनिल भाईदास पाटील साहेब, एजाज मलिक, नदीम मलिक, फैसल मलिक, अब्दुल वहाब मलिक, सैय्यद हारुन भाई, हारीस मलिक, अरशद मलिक, हुजैफ मलिक उपस्थित होते.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!