
रावेर (शरीफ शेख)
अलफैज फाउंडेशन ची जळगाव येथील सिवहील हास्पीटल मधे मेडिकल कॉलेज चे डीन डाॅ भास्कर खैरे यांची भेट धेऊन त्यांना ईद च्या शुभेच्छा देऊन कोरोना चे रूग्णां बद्दल चर्चा करून अनेक समस्यांचे निवारण करण्या बाबत मांगणी केली त्यात प्रमुख्याने पेशंट चे “स्वाॅप” रिपोर्ट बद्दल जे विलंब होत आहे. ते विलंब ना करता ती त्वरित देण्यात यावी. हॉस्पीटल मधे डाॅक्टरांची रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्या व त्यात शासन निर्णय नुसार 2.5 टक्के जागा बी यु एम् एस डाॅक्टर्स ची निवड करण्यात यावी. सफाई बाबतीत विशेष लक्ष देण्यात यावे वगैरे अडचनी वर सखोल चर्चा करण्यात आली. श्री डाॅ खैरे साहेबानी सर्व समस्यां चे निराकरण करण्या चे आश्वासन दिले.
समाज म्हणून आपली नैतिक जबाबदारी समझून फाउंडेशन तर्फे ‘कोविड वार्ड’ साठी चार वाटर कूलर देण्या चे करीम सालार यांनी मान्य केले,शिवाय “टीम अलफैज” तर्फे कोरोना रूग्णांना बाॅयीलड अंडी देण्यात येईल. असे ही ठरले.
या वेळी श्री खैरे साहेबांनी सांगितले कि कोणाला ही कोरोना चे लक्ष्ण दिसल्यास त्यांनी त्वरित हास्पीटल ला यावे त्यांचा योग्य उपचार करण्यात येईल.
या शिष्ट मडंळात अलफैज चे मार्गदर्शक करीम सालार , इफ्तिखार गुलाम रसूल,टीम अलफैज चे डाॅ शोएब शेख ,अय्यूब शेख सर उपस्थित होते.











































