Home मराठवाडा शिवणगाव येथील बोगस विहीर प्रकरणी चौकशी न झाल्यास उपोषण

शिवणगाव येथील बोगस विहीर प्रकरणी चौकशी न झाल्यास उपोषण

109

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना – जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक विहिरीचे काम सुरू झाले आहे.

सदरील विहिरीचे काम हे रोजगार हमी योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेले आहे.परंतु ग्रामपंचायतीच्या वतीने कामावर मजुरांना न बोलविता पोकलेन मशीनच्या साहाय्याने विहिरीचे काम सुरू आहे.गोदावरी नदीपात्रात विहिरीचे काम सुरू असल्याने दुषित पाणी विहिरीत येत आहे. या बोगस विहीर प्रकरणी चौकशी करण्यात यावी नसता एक जून पासून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा विश्वजीत तौर यांच्यासह ग्रामस्थांनी घनसावंगी पंचायत समितीकडे निवेदनाद्वारे दिला आहे आहे. या निवेदनात म्हटले आहे कि,शिवणगाव येथील सार्वजनिक विहिर ही गावच्या पश्चिमेस सुरू करण्यात आली आहे. याकामी स्थानिक पातळीवर मजुरांना शासनाने रोजगार हमी योजनेचे काम उपलब्ध करून दिले आहे.मात्र सरपंच, ग्रामसेवक आणि अभियंता यांनी संगनमत करून सदर विहिरीचे काम मजुरांऐवजी पोकलेन मशीनच्या साहाय्याने करून घेतले जात आहे. यासंदर्भात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विश्वजीत तौर यांनी केली आहे. या कामी दिरंगाई झाल्यास एक जून पासून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा विश्वजीत तौर यांच्यासह सुर्यकांत तौर , विजय तौर , संतोष तौर , बाळू तौर , पंकज तौर , बाळासाहेब तौर , उमेश तौर , अमिततौर, प्रेमतौर , जगनतौर , अमोल तौर आदी ग्रामस्थांनी केली आहे.