May 29, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

शासनाने रमजान ईद च्या नमाज साठी सुविधा उपलब्ध करून द्यावी- मुस्लिम संघटनांची प्रशासनाकडे मागणी

एजास शाह

जळगाव ,

कोरोना या संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी शारीरिक अंतर तसेच तोंडावर मास्क व सनी टायजर चा उपयोग करून शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून रमजान ईद ची नमाज मशिदीमध्ये मर्यादित संख्येत अदा करण्याची परवानगी देण्यात यावी अशी एकमुखी मागणी जळगाव शहरातील सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने कुल जमाती कौन्सिल तर्फे आज जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत शासनाला करण्यात आलेली आहे.

या शिष्टमंडळात शहर काझी मुफ़्ती अतिकउर रहेमान, आलिम मौलाना सलीक सलमान, हाजी अब्दुल गफ्फार मलिक, फारुक शेख अब्दुल्ला व कुल जमातीचे डॉक्टर जावेद शेख यांचा समावेश होता.
माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकने यांनी शिष्टमंडळाच्या सर्व बाबी ऐकून मी व्यक्तीशाह तुमच्या मताशी व सूचनांची सहमत असलो तरी शासनाच्या या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ज्या गोष्टी समाविष्ट नाही त्याची परवानगी मी देऊ शकत नाही ही परतू आपली मागणी मी तातडीने शासनाला कळवितो असे आश्वासन दिले.

*मुस्लिम समुदायाची कुल जमाती कौंसिल ने सभा घेतली*
गुरुवारी मुस्लिम इदगाह मशिदीत कुल जमाती कौन्सिल जळगाव तर्फे हे उलमा अलीम व व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली होती त्यात डॉक्टर जावेद शेख यांनी सभेचा उद्देश समजावून सांगितला व ईद च्या नमाज साठी प्रयत्न करावे अथवा नाही याबद्दल आपले स्पष्ट विचार मांडा अशी भूमिका विशद केल्यावर सभेत उपस्थित मनियार बिरादरीचे फारुख शेख ,काँग्रेस आय पक्षाचे जमील शेख, मुलतानी बिरादरीचे फिरोज मुलतानी ,मौलाना आझाद विचार मंचचे अब्दुल करीम सालार, शहा बिरादरीचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर अमानुल्ला शाह, नगरसेवक प्रतीनिधी हाजी युसुफ, जमात-ए-इस्लामी चे मुस्ताक मिर्झा ,अक़्सा मशिदीचे मौलाना सलीक सलमान, सुन्नी रजा मस्जिद ट्रस्ट इक्बाल वजीर, मदिना मशीद चे प्रमुख मुफ़्ती अफजल खान, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक महाराष्ट्राचे अध्यक्ष गफ्फार मलिक व सभेचे अध्यक्ष मुफ़्ती अतीक उर रहमान यांनी आपले विचार व सूचना स्पष्टपणे मांडून याप्रकरणी आपली ईद ची नमाज ची मागणी प्रशासना च्या मध्यमाने शासनाकडे करण्यात यावी असे बहुमताने ठरल्याने नियुक्त केलेले प्रतिनिधींना प्रशासनाची िल्हाधिकार्‍यांची भेट घ्यावी असे ठरले होते त्यानुसार आज ही भेट घेण्यात आलेली आहे.

*सभेला यांची होती उपस्थिती*
नगर सेवक रियाज़ बागवान,कुल जमाती चे सय्यद चाँद, बशीर बुरहानी,रउफ़ खान, वाहिदत चे अतीक शेख, कादरिया फाऊंडेशनचे फारूक कादरी, हॉकर्स चे फारुख आहिलेकार, अमन फॉउंडेशन चे शाहिद सय्यद, मनियार बिरदारीचे ताहेर शेख,जामा मस्जिद ट्रस्ट तय्यब शेख,एम आय एम चे ज़िया बागवान,डॉ रिज़वान खटिक,ईदगाह ट्रस्ट अनीस शाह,
मुफ़्ती हंजला ,मौलाना मुख्तार नदवी, एम पी जे चे आरिफ देशमुख ,इक्बाल शा ऑपरेटर, इक्बाल मिर्झा , आदींची उपस्थिती होती

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!