June 3, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपली,गरजू ,बेघर लोकांना दिला मदतीचा हात…

लक्ष्मण बिलोरे

जालना – जोपर्यंत लॉकडाऊन राहील तोपर्यंत सहाय्यता फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू ,बेघर, निराधारांना किराणा किट जेवण मास्क सॅनिटायझर स्वखर्चाने देण्यात येत आहे. फुलंब्री तालुक्यातील तेरा हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकी जपत साहाय्यता फाउंडेशनची स्थापना केली. व गरजू लोकांना मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या वतीने संपूर्ण देशभरात लाॅकडाउन जाहीर करण्यात आलेले आहे.यामुळे घरात बंदिस्त असलेल्या गरीब लोकांची उपासमार होऊ नये म्हणून आपण ज्या धरतीवर जन्म घेतला त्याअर्थी आपलेही माणूस्किच्या नात्याने कर्तव्य आहे या भावनेतून गोरगरीब गरजवंतांच्या अडचणी लक्षात घेता सहाय्यता फाउंडेशनच्या सेवाकार्य अविरत सुरू आहे.
त्याच अनुषंगाने फुलंब्री तालुक्यातील गरजु, अपंग निराधार बेघर तसेच दुसर्‍या राज्यातून व्यवसाय करण्यासाठी आलेले बरेच लोक लॉक डाऊन असल्यामुळे त्यांचे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहे त्यांना कोणतेही काम नाही, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून फुलंब्री तालुक्यातील आळंद गावातील सहाय्यता फाउंडेशन अशा गरजवंतासाठी पुढे आले आहे. सहाय्यता फाउंडेशन च्या माध्यमातून 27-03-2020 पासून गरजू लोकांच्या मदतीला सहाय्यता फाउंडेशन धावून आले आहे. सामाजिक बांधिलकी जपून सहाय्यता फाउंडेशनने आत्तापर्यंत मध्यप्रदेश राजस्थान उत्तरप्रदेश मधून
अजित सिड्स कंपनी समोर राजस्थान मधील गारुडी खेळ दाखवणारे लोक ते सुमारे 100 लोकांना जेवण देऊन सुरुवात करण्यात आली आहे.
बोरगाव फाटा येथे अद्रक काढणारे मध्यप्रदेश मधील कामगारांना जेवण व तसेच खामगाव फाट्यावर
थांबलेल्या कामगारांना सलग आठ दिवस जेवण देण्यात आले.
खामगाव येथील खदानी वर काम करणारे कामगारांना जेवण देण्यात आले. तसेच नायगाव येथे भिल्ल वस्ती मध्ये गरजू लोकांना जेवण देण्यात आले.
कामगारांना 1700 गरजू लोकांना जेवण व मास्क देण्यात आले.
सहाय्यता फाउंडेशनच्या माध्यमातून 7000 मास्क विविध गावांत तसेच फुलंब्री मध्ये ते वितरित करण्यात आले.
तसेच संपूर्ण फुलंब्री तालुक्यातील 1000 सैनी टायझर बॉटल वितरित करण्यात आल्या.
फुलंब्री तालुक्यात विविध ठिकाणी गरजू लोकांना सहाय्यता फाउंडेशन तर्फे पाच किलो गहू पाच किलो तांदूळ एक लिटर तेल एक किलो साखर एक किलो मीठ मिरची पावडर हळदी पावडर अंबारी चहा पत्ती बिस्कीटचा पुडा तोसचा पुडा कपडे धुण्याची साबण निरमा व आंघोळीची साबण इ. प्रत्येक कुटुंबाला वितरित करण्यात आले. फुलंब्री नायगव्हाण आळंद कोलते टाकळी ,पिरबावडा ,बाबुळगाव, सताळा ,गोसेगाव ,खामगाव फाटा या गावात 650 कुटुंबांना किराणा किट गहू-तांदूळ देण्यात आले. तसेच फाऊंडेशनच्या माध्यमातून लोकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती देखील करण्यात आली.
यासाठी लागणारा पैसा सहाय्यता फाउंडेशनच्या 13 सदस्यांनी मिळून पैसे जमा केले .कोणाकडून देणगी न घेता स्वखर्चाने 450000 जमा आम्ही केले .त्यातील सदस्य
अध्यक्ष इसाक पठाण
उपाद्यक्ष सीताराम वाघ
सचिव समीर पठाण
कार्याध्यक्ष नईम बेग
सल्लागार कदिर पठाण
गणेश भागवत
हरिदास पायगव्हान
शरफोद्दीन कु. सय्यद
शरफोद्दीन स. सय्यद
गणेश भागवत
दत्तात्रय सोमदे
शिवाजी सोमदे
गणेश वाघ
सलीम शेख
तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहाय्यता फाऊंडेशनचे कौतुक केले.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गरिबांना मदत करत आहे ते खूप कौतुकास्पद आहे अशी कौतुकास्पद उद् गार फुलंब्रीचे तहसिलदार सुरेंद्र देशमुख यांनी काढले.
कोरोना या रोगामुळे अडकलेल्या लोकांना व गरीब लोकांना कोणतीही देणगी न घेता सहाय्यता फाउंडेशन मदत करत आहे.असे सहायक पोलिस निरीक्षक तांबे यांनी म्हटले.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!