June 3, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

कापूस पळाटीच्या ढीगली समोर मुंडन करत कापूस खरेदी प्रक्रियेचा चा निषेध

गोपीचंदगडावर सखाराम बोबडे यांचे आंदोलन

परभणी / गंगाखेड – एकदम कासवगतीने सुरू असलेल्या शासनाच्‍या कापुस खरेदी च्या निषेधार्थ पडेगाव येथील गोपीचंदगड शिवारात गुरुवारी शेतकऱ्याने कापूस पळाटी च्या ढिगली समोर मुंडण आंदोलन आंदोलन केले. शेतकरी सखाराम बोबडे पडेगावकर यांनी यासाठी पुढाकार घेतला.

चार मे रोजी लाॅकडाऊनच्या काळात शासनाने कापूस खरेदी प्रक्रिया सुरू केली .एकदम कासवगतीने सुरू असलेल्या या कापूस खरेदी प्रक्रियेत एका दिवशी एका खरेदी केंद्रावर 25 ते 30 शेतकऱ्यांच्या गाड्या घेतल्या जात आहेत. 45 हजार शेतकऱ्यांची नोंदणी असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात 7 ते 8 केंद्रावर दररोज अडीशे तीनशे गाड्याचे हे मोजमाप होत आहे. पेरणीचा हंगाम येण्यास पंधरा दिवस अवधी असल्याने सध्याच्या गतीने चालू असलेल्या कापूस खरेदी प्रक्रियेत 45 हजार शेतकऱ्यांची कापूस खरेदी होणे अशक्यच आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात कापूस खरेदीची केंद्रे वाढवून दररोज चार ते पाच हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केल्यास सात जून पर्यंत सर्व शेतकरी कापूस विकणे शक्य होणार आहे. लाॅकडॉऊन मुळे सर्व शेतकरीवर्गाने घरात बसून रहावे असे शासन सांगतय आणि घर हे कापसाने भरलेले आहे अशा विचित्र परिस्थितीत शेतकरी अडकले आहेत. तरी या कष्टाने पिकवलेला कापूस शासन खरेदी करते की नाही या भितीने घाबरलेला शेतकरी आपला कापूस मातीमोल भावाने खाजगी व्यापाऱ्याकडे घालताहेत. आणि कासव गतीने चालत असलेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्रावर मात्र दुसऱ्या वेचणीचा कापूस शासन खरेदी करत नाही अशी एकूण विचित्र कोंडी शेतकऱ्याची होत आहे .या सर्व प्रकरणाचा निषेध म्हणून परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार,तथा धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी गुरुवारी गोपीचंदगड शिवारातील त्यांच्या स्वतःच्या शेतात मुंडन आंदोलन केले यावेळी शेतकरी संभाजी बोबडे ,दिगंबर बोबडे ,आशिष बोबडे उपस्थित होते.

शासन शेतकऱ्यांना शत्रूची वागणूक देत आहे -बोबडे

शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा माय-बाप म्हणून ज्यांनी जबाबदारी पार पाडायला पाहिजे असं सरकार आणि प्रशासन मात्र शेतकऱ्यांना शत्रू सारखी वागणूक देत असल्याचा आरोप शेतकरी सखाराम बोबडे यांनी व्यक्त केला. शासनाने लवकरात लवकर कापूस खरेदी केंद्र वाढून सर्व शेतकऱ्यांचा ,आणी सर्व प्रतीचा कापूस खरेदी करावा अशी मागणीही त्यांनी केली.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!