Home मराठवाडा आजारी रुग्ण , अपंग , अंध निराधार यांची सेवा करणाऱ्या डाक कर्मचाऱ्यांचा...

आजारी रुग्ण , अपंग , अंध निराधार यांची सेवा करणाऱ्या डाक कर्मचाऱ्यांचा कोरोनायोध्दा म्हणून सन्मान व्हावा , “जनतेत चर्चा”

204

नांदेड – कोरोनाच्या या महामारीत देश विळख्यायत अडकला आहे.
या कोरोनाच्या महामारीच्या संकटकाळी दिवसरात्र डाक कर्मचारी, पोस्टमन, ग्रामीण डाक सेवक हे ग्रामीण भागात, वाड्या तांड्यात,गावात शहरात गोरगरीब,व गरजू लोकांत पर्येंत पोस्ट बँकेच्या माध्यमातून शासकीय अनुदान पैसे , टी. बी , कैन्सर , किडनी , ब्रेन,अशा आजारी रुगणाची औषधी व गोळ्या इजक्शन डोस, जनतेसाठी फळे,भाजी तर अपंग,निराधार, अंध , विधवा , गोरोदर महिलांना अनुदान घरपोच सेवा करीत.
देश सेवा बजावत आहेत. आज किती तरी लोक आपले जीवन घरीचं आपल्या परिवारात जीवन जगतांना दिसत आहेत हे आपल्याला दिसून येत आहे.
पण पोस्टमन चे जीवन हे प्रेमळ असत,गरीब गाय सारख असत.
तो सर्वांच्या सुखा दुःख च ओझं आपल्या खाद्यावर घेऊन वाड्या तांड्यात, गावात शहरात प्रत्येकाच्या घरी सायकलने किंवा पायी घेऊन त्या लोकांपर्यंत पोहोचतो कोणाचे देश सेवा व नोकरीचे पत्र,कोणाचे लग्नाचे पत्र,मूल जन्माला आलेले पत्र,कोर्टाने पाठवलेली नोटीस,तर विध्यार्थीत्याचे परीक्षा दिलेले तपासणी पेपर, लहान मोठ्या विध्यार्थ्याचे व न्यायालयाचे अभ्यासक्रम पुस्तके,व बरे वाईट संदेश कोरोना संकटात व हिवाळा,उन्हात,पावसाळ्यात घरोघरी सेवा जाऊन देतो.
ग्रामीण भागातील बुद्रुक व्यक्तीला पत्र वाचता येत नसेल तर त्याला सुख दुःख ची बातमी वाचून देखील सांगतो.
डाक कर्मचारी एक शाधे जीवन जगतो.
पोस्टमन हा बँके सोबत भावना देखील पोहचतो.
आज कोरोना महामारी असून देखील आपली जनते बरोबर जवाबदारी इमानदारीने पार पाडीत आहे.
कोरोना मुले कोणाच्या घरात जाता येत नाही, कोणी पाणी प्याला मिळत नाही. आशा परिस्थितीत पोस्टमन व डाक कर्मचारी देश सेवा करीत आहेत.
या डाक कर्मचाऱ्यांना कोरोना योध्दा म्हणून सन्मान व्हावा अशी जनतेत मागणी व चर्चा होत आहे.