July 7, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

महाराष्ट्र राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवार दि.१९ मे २०२० रोजी मंत्रालय,मुंबई येथे विभागाची आढावा बैठक पार पडली

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

मुंबई – या बैठकीत माहे मे व जून महिन्याच्या अन्नधान्य वितरणाचा आढावा,रेशनकार्ड नसलेल्या गरीबांसाठी धान्य वितरण करण्याबाबत केंद्र शासनाच्या योजनेची अंमलबजावणी करणे,स्वस्त धान्य दुकानांसाठी विमा कवच,हमाल व वाहतूक कंत्राटदार यांना वेळेवर अनुदान उपलब्ध होणे, अन्न धान्य विकत घेण्यासाठी प्रलंबित अनुदान,सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे खाद्यतेल,भरडधान्य इ.वितरण करण्यासाठी नवीन योजना तयार करणे, तुरडाळ-चनाडाळ नियतन, उचल व वितरण व शिवभोजन उद्दिष्ट या विषयांवर चर्चा झाली व विविध उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला.
कोव्हीड १९ च्या महामारीच्या नियमांचे पालन होण्यासाठी फिजिकल डीस्टन्स राखत सचिव आणि सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्याच उपस्थितीत सदर आढावा बैठक पार पडली. बैठकीस अन्न,नागरी पुरवठा विभागाचे सचिव संजय खंदारे,मुंबई रेशनिंगचे नियंत्रक श्री.कैलास पगारे, सहसचिव सतिष सुपे,चारुशीला तांबेकर हे उपस्थित होते

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!