July 14, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

मनसेच्या अनिलभाऊ हमदापुरे यांची नाथ समाजास धान्याची मदत….!

जाणीव समाजाची-शिदोरी मायेची या उपक्रमा अंतर्गत….!!

यवतमाळ – आर्णी येथील नाथजोगी समाजातील रघुनाथ शितोळे या व्यक्तीने आत्महत्या करून स्वताचे जीवन संपविले होते त्यांची परिस्थिती खूप हलाखीली होती.तेथील नाथ समाजबांधवांनी समाजाच्या लोकांना मदत व्हावी म्हणून “जाणीव समाजाची-शिदोरी मायेची” हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.त्या मदत कक्षा चे प्रमुख कानिफनाथ पटवेकर,विलास लाखे,शाम उदमकर विजय काळे हे काम बघत आहे.
नाथजोगी समाज संघटनेचे यवतमाळ अध्यक्ष,मोंटु उदमकर यांनी मनसे अध्यक्षांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली तेव्हा मनसेच्या अनिलभाऊनी परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी मोंटु उदमकर यांना ताबडतोब मदत करण्याचे ठरविले व धान्य त्यांच्या सुपूर्द केले.अनिलभाऊंच्या माध्यमातून लॉक डाउन च्या पहिल्या दिवसापासून धान्याची गरज वंतांना मदत अविरत सुरू आहे.अनिलभाऊनी मदत केल्याची पावती म्हणून नाथजोगी समाज आर्णी तर्फे अनिल हमदापुरे यांचे आभार मानले..

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!