Home मराठवाडा बिडकिन येथे १००गरजू लोकांना ईश्वर मेडिकल यांच्यावतीने किराणा सामान वाटप

बिडकिन येथे १००गरजू लोकांना ईश्वर मेडिकल यांच्यावतीने किराणा सामान वाटप

158

रविंद्र गायकवाड

औरंगाबाद / बिडकिन – आज दि.१८ रोजी बिडकिन येथील काशिराम कोथिंबीरे ( ईश्वर मेडिकल ) यांच्या वतीने बिडकिन या गावातील १०० गरजू लोकांना किराणा सामानाची कीट वाटप करण्यात आली. सध्या जगभरात कोरोना विषाणुने थैमान घातले असून देशात लॉकडाऊन चा निर्णय घेण्यात आला आहे. या महामारीचा सामना करतांना हातावर पोट असलेल्या नागरिकांची मात्र परवड होत आहे याच अनुषंगातून दानशूर लोकांचे हात सुद्धा मोठ्या प्रमाणात पुढे आलेले दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर बिडकिन गावातील ईश्वर मेडिकल ते मालक काशिराम कोथिंबीरे यांनी कुठलाही रिकामा खर्च न करता गावातील १०० गरजू लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी स्वखर्चाने गरजूंना किराणा सामानाच्या कीट चे वाटप केले.
शासन आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करून सोशल डीस्टंस चा वापर करुन हा कार्यक्रम घेण्यात आला त्यांमूळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ पञकार हसन चाऊस,पञकार सऊद चाऊस,पञकार किरण औटी,पञकार रविंद्र गायकवाड,मोसिन शेख,अमजद शेख,सलिम शेख आदींसहित हि किराणा सामानाची किट गरजुपर्यंत पोहचविण्याकरिता मित्र-मंडळानी पुढाकार घेतला.