Home सोलापुर तहसीलदार अंजली मरोड यांच्या नेतृत्वाखाली कोरोनो समिती कार्यरत

तहसीलदार अंजली मरोड यांच्या नेतृत्वाखाली कोरोनो समिती कार्यरत

190

अक्कलकोट – ( प्रतिनिधी )

ओ वैनी….ओ काकू….घरात बसा ना….हे सर्व तुमच्यासाठीच तर चाललं आहे. असे खडे बोल गावपातळीवरील कोरोना प्रतिबंधक समिती बजावत असून, कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील गावकऱ्यांनी कोरोनासाठी लढा देण्यासाठी गावपातळीवर कोरोना प्रतिबंध समिती तहसीलदारा मार्फत स्थापन करण्यात आली आहे.

कोरोना प्रतिबंध समितीने गावकऱ्यांसाठी नियमावली तयार केली आहे. नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करून शंभर टक्के लॉकडाउन करण्याचा निर्धार केला आहे. शिवाय बाहेरगावाहून आलेल्यांना घरातच बसण्याची सूचना करून संपूर्ण गाव लॉकडाउन केल्यामुळे गावात सर्वत्र शुकशुकाट आहे.

पुणे, मुंबई यांसारख्या शहरात कामासाठी गेलेले गावकरी गावाकडे येत आहेत. गावात आलेल्या या गावकºयांची नोंद घेण्यात आली असून, त्याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. त्याना अक्कलकोट तालुक्यातील प्रियदर्शनी मंगल कार्यालयात पासची सोय करण्यात आली असून, रेड झोन च्या लोकांना अक्कलकोट मध्येच क्वांरंटाईन करण्यात येत असून, तर ऑरेंज झोन च्या लोकांना आपापल्या गावपातळीवरील जि प शाळेत क्वांरंटाईन करत असून, ग्रीन झोन च्या लोकांना त्यांच्या घरीच क्वांरंटाईन करण्यात येत आहे.शिवाय घराबाहेर पडू नका अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.

या कोरोना समितीतील सुपरवायझर, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, पोलीसपाटील, कोतवाल, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, या सर्व शासकीय कर्मचारी गावपातळीवर आतिशय काटेकोरपणे आपली सेवा बजावत असून, गावात सर्व कामे युद्धपातळीवर हाताळले जात असून, या समितीवर विभाग विस्तार अधिकारी, सुपरवायझर, मंडळ अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी, यासारख्या नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवत असून, गावकºयांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन कोरोना प्रतिबंध समितीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत असून, त्यात ग्रामस्थांनी वारंवार हात धुणे, शिंकताना व खोकताना तोंडाला रु माल, मास्क बांधणे, घरासमोर व दारासमोर साबण व पाण्याची बादली भरून ठेवणे, बाहेरून आल्यानंतर घरात जाण्यापूर्वी हात, पाय, तोंड साबणाने धुणे, गावात अनावश्यक फिरू नये, गावात घोळका करून बसू नये, आपापल्या घरात थांबावे, घराची व परिसराची रोज साफसफाई करावी, सर्दी-खोकला-ताप आल्यास तत्काळ डॉक्टरांना भेटावे, गावात बाहेरून आलेल्या नागरिकांनी घरात थांबावे व कुटुंबातील व्यक्तीपासून दूर राहावे, भाजीपाला, किराणा, औषधे यांची योग्य दराने विक्र ी करताना ग्राहकांनी वस्तू घेताना सामाजिक अंतर ठेवावे, नियमांचे पालन केले नाही तर नियुक्त स्वयंसेवक दंडात्मक कारवाई करतील, सार्वजनिक जागेवर व ओट्यावर बसून गप्पा मारणे बंद करावे, गावात अवैध दारू विक्र ी बंद करावी, असे निर्बंध लादण्यात आले आहेत. सूचना व नियमाचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे.

अक्कलकोट कर्तव्यदक्ष तहसीलदार अंजली मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय काटेकोरपणे ही समिती कार्यतत्पर असून, समितीतील सर्वच कर्मचारी हे आपली सेवा बजावत असून, अक्कलकोट सह मैंदर्गी, दुधनी, चे मुख्याधिकारी यांच्या नियंत्रणाखाली अक्कलकोट तालुक्यातील तिन्ही नगरपालिकेचे सर्व कर्मचारी काम करत आहेत. कोरोना प्रतिबंधक समितीच्या या सर्व कर्मचाऱ्यांचा दररोजचा आढावा, अपडेट तहसीलदार हे घेत असून, ज्या ठिकाणी काही बाबतीत निर्णय असतील ते तहसीलदारांच्या मार्फत घेतले जातात. अक्कलकोट तालुक्यातील तमाम जनतेकडून या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे व गावपातळीवरील समितीचे कौतुक होत आहे