July 4, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

नागपुरमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते गरजूंना अन्नधान्य वाटप..!

विरोधी पक्ष नेत्यांकडून शंभुसेना , माजी सैनिक आघाडीचे कौतुक….!

नागपुर , दि. १८ – (प्रतिनिधी) – शहरात दिनांक १६ मे रोजी शंभुसेना, माजी सैनिक आघाडीच्या वतीने माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते नागपूर दौऱ्या दरम्यान गरजू कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.सध्या लॉकडाऊच्या संकट काळात राज्यभर गंभीर परिस्थिती असल्यामुळे शंभुसेना, माजी सैनिक आघाडीच्या वतीने राबवत असलेल्या विविध समाजकार्याचा आढावा घेत, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नागपूर दौऱ्या दरम्यान माजी सैनिक आघाडीच्या संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट दिली असता, माजी सैनिक आघाडीचे उपाध्यक्ष मा. रामजी कोरके यांच्याशी समाज कार्याबाबत सविस्तर चर्चा झाली. चर्चेत शंभुसेना संघटनेचे प्रमुख/ अध्यक्ष व माजी सैनिक मा.दिपकजी राजेशिर्के व आघाडीचे उपाध्यक्ष रामजी कोरके यांच्या वतीने सुरू असलेल्या विविध कार्याची माहिती घेऊन संघटनेच्या निस्वार्थ समाजकार्याची स्तुती करत, विशेष आभार व्यक्त केले, तसेच एकत्रीत कामाची माहिती घेऊन सर्वच कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप टाकत कार्यकर्त्यांंना प्रोत्साहन देत भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. संपर्क कार्यालयातील सदिच्छा भेटी नंतर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते अनेक गोरगरीब कुटूुंबाना अन्न धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष रामजी कोरके यांच्यासह अनेक माजी सैनिक उपस्थित होते. या समाजकार्यास किल्ले धर्मवीरगड येथील ऐतिहासिक शिर्के घराण्याचे वंशज, शंभुसेना प्रमुख व माजी सैनिक मा. दिपक राजेशिर्के, उपाध्यक्ष मा.राम कोरके, महिला आघाडी अध्यक्षा सौ. ज्योत्स्ना गर्गे, उपाध्यक्षा सौ. निर्मला पवार, माजी सैनिक आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष मा. सुनिल काळे, शंभुसेनेचे लक्ष्मीकांत राजेशिर्के, माजी सैनिक आनंद ठाकूर, बाबासाहेब जाधव, भास्कर पवार, बी.व्ही जाधव, एम.व्ही बिराजदार, रामचंद्र पानसरे, राज ठाकूर, रमेश गायके, आजितराव निंबाळकर, सचिन वाघमारे, पिंपरी चिंचवड शहरातील माजी सैनिक आघाडी व पदाधिकारी शंभुभक्त कार्यकर्ते यांचे योगदान लाभले.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!