
रविंद्र साखरे सह इकबाल शेख
वर्धा / तळेगाव (शामजी पंत) दिनांक 18/ 5/ 2020 आज सगळीकडे कोरोना मुळे हाहाकार उडाला असून कोरोना या विषाणूची धास्ती आज प्रत्येक नागरिकांनी घेतलेली आहे. अशीच घटना तळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या सारवाडी जवळ असलेल्या अनुष्का धाब्या समोर उघडकीस आली यातील हकीकत अशी की मुंबईवरून गोरखपुर उत्तर प्रदेश येथे जाण्याकरिता सतरा ते अठरा मजूर एका ट्रकमध्ये बसले व आपल्या प्रवासाकरिता निघाले असता ट्रक मधील एका व्यक्तीची प्रकृती खालावल्यामुळे ट्रक ड्रायव्हर व त्यातील बाकीच्या मजुरांनी निर्णय घेऊन दोन व्यक्तींना ट्रक मधून उतरून दिले. सविस्तर वृत्त असे की मुंबईवरून गोरखपुर उत्तर प्रदेश कडे निघालेल्या ट्रक क्र. त्याचा नंबर माहिती पडलेला नाही मधील मजुरां सोबत मृतक शांतालाल यादव वय अंदाजे 80 वर्ष व रामसुमेर कशीलाल यादव वय 52 वर्ष राहणार गोरखपुर उत्तर प्रदेश हे दोघेही त्या ट्रक मधूनच प्रवास करीत होते. शांतालाल त्यांच्या जावयाकडे मुंबईला राहत होते व रामसुमेर मृतकाच्या जावयाच्या ओळखीचे असल्यामुळे त्यांनी रामसुमेर यांना माझे सासरे यांनासुद्धा गावी जायाचे आहे तेव्हा तुम्ही माझे सासऱ्यांना सुद्धा घेऊन जा म्हणून दिनांक 16 तारखेला ट्रकमध्ये बसवून दिले. रात्रभर प्रवास केल्यानंतर तळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सारवाडी जवळील अनुष्का ढाब्या जवळ एका झाडाखाली दोघांनाही ट्रकमधुन दुपारी दोन ते तीन वाजताच्या दरम्यान उतरून दिले. मात्र त्यांच्याकडे कोणतेही व्यवस्था नसल्यामुळे त्या म्हाताऱ्याने रात्री 7.00 ते 7.30 वाजताच्या दरम्यान शेवटचा श्वास घेतला. त्या म्हातार्याला ताप, सर्दी, खोकला असल्यामुळे व सोबतच्या व्यक्तीला सुद्धा तोच त्रास असल्यामुळे इतर मजूर व ट्रक ड्रायव्हरने हा निर्णय घेतला. मृतक व सोबतचा व्यक्ती व त्यातील काही मजूर हे एकाच गावचे रहिवाशी होते. याची माहिती कारंजा येथील डॉक्टर सचिन इंगळे यांनी सारवाडी येथील रुग्णालयाला दिली. तेव्हा सारवाडी येथील सरपंच व पोलीस पाटील तसेच सारवाडी येथील रुग्णालयाची पूर्ण टीम व तळेगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार रवि राठोड. जमादार कैलास माहुरे. अनिल ढाकणे. अमोल मानमोडे. देवानंद गुजर यांनी घटनास्थळी पोहोचून जागेवरच सारवाडी येथील डॉक्टरचे सांगण्यानुसार अंत्यविधी आटोपून दुसऱ्या गंभीर आजारी व्यक्तीस 108 चे सहाय्याने त्याची कोरोणाची तपासणी करण्याकरिता वर्धेला नेण्यात आले. या घटनेविषयी गावकर्यांत मात्र भीतीचे वातावरण दिसुन येत आहे. सदरचा तपास ठाणेदार रवी राठोड यांचे मार्गदर्शनात जमादार कैलास माहुरे.अनिल ढाकणे. अमोल मानमोडे. देवानंद गुजर करीत आहे.










































