Home विदर्भ वऱ्हाड संस्थेच्या उपक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांची भेट

वऱ्हाड संस्थेच्या उपक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांची भेट

343

आत्तापर्यंत एक लाख पेक्षा अधिक लोकांना दिले जेवण

मनिष गुडधे

अमरावती – कोरोनामुळे सध्या देशात सरकारने लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे तसेच परप्रांतीय मजुरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. त्यामुळे वऱ्हाड संस्थेच्या माध्यमातून गोर गरिबांना व तसेच अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून घरी जाणाऱ्या परप्रांतीय मजूरांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे.

आणि आमचा हा उपक्रम गेल्या 50 दिवसापासून अविरत सुरू आहे. आम्ही आत्तापर्यंत जवळ जवळ एक लाख पेक्षा जास्त लोकांना जेवण पुरावलेले आहे. त्यामुळे आमच्या या कामाची दखल घेत अमरावती जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी स्वतः येउन आमच्या कामाची पाहणी केली व आमचे अभिनंदन केले.