Home मराठवाडा लाचेची मागणी केल्या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यां वर गुन्हा दाखल…!

लाचेची मागणी केल्या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यां वर गुन्हा दाखल…!

108

वर्धा / तळेगांव (शा.पं.) , दि. १५ – पोलीस स्टेशन तळेगांव मधील लोकसेवक अंकुश मारोतराव येडमे बखल नं. १२०२ यांनी आपले लोकसेवक पदाचा दुरुपयोग करुन यातील फिर्यादी पुरुषोत्तम मोरघडे रा. तळेगांव यांचा कोणताही संबंध नसतांनी दारुचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देवुन कोणतीही कारवाई न करण्याकरीता १३००० रुपये लाचेची मागणी करुन लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली आरोपी लोकसेवक यांना ला.प्र. वि. चा कारवाई बाबत संशय आल्याने त्यांनी लाच स्विकारण्याचे टाळले अशा फिर्यादीच्या लेखी तक्रारी वरुन गुन्हा नोंद केला असुन कलम ७ भ्रष्ट्राचार प्रतिबंधक अधिनीयम १९८८( संशोधन) सन २०१८ अंतर्गत कारवाई करुन आरोपीस चाैकशी करीता ताब्यात घेतले सदरची कारवाई एसीबी नागपुर चे पी. आय. सारंग मिरासे यांनी केली.

रविंद्र साखरे सह इकबाल शेख 9890777242 / 9834453404