Home मराठवाडा कोरोना या विषाणु वायरस च्या पार्दुभाव रोखण्यासाठी औरंगाबाद रेड झोन मधुन ये~जा...

कोरोना या विषाणु वायरस च्या पार्दुभाव रोखण्यासाठी औरंगाबाद रेड झोन मधुन ये~जा न करता मुख्यालयी राहावे. या मागणीला यश~अमोल नरवडे

178

महाराष्ट्र संघटक,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व सदस्य,रुग्ण कल्याण समिती,तथा संस्थापक अध्यक्ष,प्रगती सेवाभावी संस्था यांच्या वतीने केली होती मागणी….

रविंद्र गायकवाड

औरंगाबाद / बिडकीन – गेल्या काही महिन्यापासुन कोरोना या माहामारीमुळे सर्व जगभरात थैमान मांडले असतांना,औरंगाबाद शहर ही रेडझोन मध्ये आले आहे.दिवसेंदिवस वाढत्या रुग्णांची संख्या पाहता मा.जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक असतांना ग्रामीण रुग्णालय बिडकीन येथील काही डॉक्टर स्टाफ हा औरंगाबाद शहरातुन ये~जा करत होता.यामुळे बिडकीन गावासह इतर परिसरात हि कोरोना संसर्गाची लागण होवु शकते.हि परिस्थिती लक्षात घेता.व ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथे १० निवासी मुख्यालय असतांना हि परिस्थिती पाहता मा.अमोल भैय्या नरवडे(महाराष्ट्र संघटक,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)व सदस्य,रुग्ण कल्याण समिती,तथा संस्थापक अध्यक्ष,प्रगती सेवाभावी संस्था) यांच्यावतीने दि.३० रोजी मा.जिल्हाधिकारी औरंगाबाद,मा.उपसंचालक कार्यालय आरोग्य विभाग औरंगाबाद,मा.जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय,औरंगाबाद,मा.तहसिलदार,तहसिल पैठण यांना निवेदन पञाद्वारे कळविण्यात आले.या विषयान्वये दि.११ रोजी मा.जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्या वतीने आदेशान्वये पञाद्वारे मा.उपसंचालक कार्यालय आरोग्य विभाग,औरंगाबाद व जिल्हा शल्यचिकित्सक,सामान्य रुग्णालय रग्णालय,यांना सुचना देण्यात आल्या कि,ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथील सर्व अधिकारी/कर्मचारी यांना सुचित करण्यात आले कि,कोरोना (covid19)विषाणु मुळे उद्भवणारे संसर्गाजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालिन उपाययोजना करण्याचे अंतर्गत वरिल संदर्भान्वये सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालयात राहण्यास असणे बंधनकारक आहे.सध्या औरंगाबाद शहर रेडझोन मध्ये असल्यामुळे कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी यांनी मुख्यालय सोडुन ये~जा करु नये असे आदेश सर्व आरोग्य विभागीय कार्यालय यांना देण्यात आले.मा.जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय औरंगाबाद यांच्या वतीने वैद्यकिय अधिक्षक,ग्रामीण रुग्णालय बिडकिन यांना पञाद्वारे कळविण्यात आले.मा.अमोल भैय्या नरवडे(सदस्य,रुग्ण कल्याण समिती,महाराष्ट्र संघटक,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)संस्थापक अध्यक्ष प्रगती सेवाभावी संस्था)यांच्या वतीने केलेल्या या उपक्रमाला यश मिळाले.या उपक्रमामुळे बिडकिन व बिडकिन परिसरातील रुग्णांना नागरिकांना चांगली प्रकारचे अत्यावश्यक सोयीसुविधा मिळेल.व अनेक रुग्णांना याचा बराच फायदा होईल.या उपक्रमाबाबत बिडकिन व बिडकिन परिसरात चांगली चर्चादेखील होत आहे.