Home विदर्भ लोकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबाना दिला युवा नेते तारिक़ साहिर लोखंडवाला यांनी मदतीचा...

लोकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबाना दिला युवा नेते तारिक़ साहिर लोखंडवाला यांनी मदतीचा हाथ…!

441

गोर , गरीब , गरजू कुटुंबाना ५ हजार किराना किट वाटप…

यवतमाळ , दि.१३ :- लॉक डाऊन मुळे प्रभावित झालेल्या कुटुंबाना राष्ट्रवादी कांग्रेस चे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद तारिक़ साहिर लोखंडवाला यांच्याद्वारे आतापर्यन्त 5 हजार किराना साहित्य किट वाटप करण्यात आले आहे.

कोरोनामुळे लोकड़ाऊन असल्याने दैनंदिन मजूरिवर वर निर्भर असलेल्या गरीब कुटुंबांची दैनावस्था होऊन त्यांना 2 वेळचे जेवन मिळने अवघड झाले आहे,ही परिस्थिति पाहता तारिक साहिर लोखण्डवाला यांनी आर्थिक मदत केली.सोबतच गरजू कुटुंबाना दिलासा मिळावा यासाठी किट पॅकिंग व वाटप करण्यात त्यांनी स्वतःला अहोरात्र झोकुन दिले आहे, त्यांच्याकडून आतापर्यन्त शहरातील पाच हजार पट्टी, अमन लेआउट, ताज बाग नगर, मोहसीन लेआऊट, शालिमार लेआऊट, अल करम लेआऊट, डोरली परिसर,अल कबीर, डेहनकर, मालीपुरा, तारपुरा,शिंदे नगर, वासिम लेआऊट भोसा , पिंपळगाव,वडगाव सह अनेक भागात गरीब व गरजू नागरिकांना तब्बल 5 हजार किराना साहित्य किट वाटप करण्यात आले आहे अशी माहिती वाटप नियोजन करीत असलेले सज्जाद अली यांनी दिली.या मदतवाटप साठी जुनैद अली जोहर,उज़ैर,शहज़ाद हुसैन जॉन,सुहैल काजी शेरा,कमर अली,इरफान शेख,नवेद शाह यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.दरम्यान कोरोना संसर्ग व प्रतिबंध लागण्यापूर्वीच अडचणीत असलेल्या इंदिरा नगर भागात त्यांच्याकडून तब्बल 200 कुटुंबाना राशन किट पुरविन्यात आली. दरम्यान तारिक साहिर लोखंडवाला मित्र परिवाराकडून मोठ्या प्रमाणात परिश्रम घेवून शहरात विविध भागात मदत वितरित करण्याचे काम 23 एप्रिल ते आतापर्यन्त सुरुच आहे. यासाठी तारिक साहिर लोखंडवाला यांच्या वतीने गरजुना राशन वाटपाचा नियोजन करन्यात येऊन किराना किट मध्ये 10 किलो तांदूळ,1 किलो तेल,1 किलो तुर डाळ,1 किलो साखर,1 पाव चहा पत्ती, नमकपुडा,मसाला पुडा,पेंड़खजुर पैकेट चा समावेश करीत गरजुना त्यांच्या घरापर्यन्त ह्या हजारो राशन किट पोहोचविल्या गेल्या,यामुळे गरजू कुटुंबाना मोठा दिलासा मिळाला.
दरम्यान प्रतिबंधित भागा सह शहरातील सर्व भागात नागरिकांनी लॉकडाऊन पर्यंत घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान तारिक साहिर लोखंडवाला यांनी केले आहे.