July 7, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

मजुरांच्या घरवापसीने उद्योगनगरीवर परिणाम होणार का?कोरोनामुळे रविवारी शेकडो मजूर विशेष रेल्वेने गावी रवाना

शहर प्रतिनिधी – गौरव बुट्टे

जालना – शहराचा नाव लौकिक उद्योगनगरी म्हणून असा आहे. या लौकिकात भर पाडण्यासाठी परप्रांतीय मजुरांचा मोठा हाताभार आहे. मात्र कोरोना विषाणूमुळे सर्व काही शांत होत आहे. आज उद्योगनगरीतील अनेक मजूर गावी परतत असल्याने त्यांचा काही एक फटका येथील उद्योगांना बसणार आहे हे निश्‍चित आहे. कोरोनामुळे असंख्य मजुरांचे हाल सुरू होत असल्याने रविवारी विशेष रेल्वेद्वारे ते उत्तरप्रदेश तसेच इतर राज्यात परतत आहेत.
शासनाने काही उद्योगांना नियम व अटींच्या आधीन राहून उद्योग सुरू करण्यास अनुमती दिली आहे. काही उद्योग सुरूही झाले आहेत. असे असले तरी परप्रांतीय मजूर,कामगार मोठ्या संख्येने निघून गेल्यास बहरात असलेले उद्योग संकटात येण्याची चिंताही काही जाणकार व्यक्‍त करत आहेत. बहुतांश सळई निर्मिती कारखान्यात परप्रांतीय कामगार आहेत. स्थानिक कामगार अशा जोखमीच्या कामावर येत नसल्याचेही कारण आहे. परिणामी सर्वच मजुरांनी कोरोनामुळे गावी जाण्याचा निर्णय घेतल्यास स्थिती बिकट होऊ शकते. काही उद्योग सुरू असले तरी ते पूर्णक्षमतेने कार्यरत झालेले नाहीत. काही कारखान्यांनी यावर उपाययोजना करून कामगारांना थांबविले आहे. मात्र घरवापसीलचे लोण वाढत गेले तर थांबलेले कामगारही घरी जाण्याचा हट्ट करण्याचा प्रश्‍न उभा राहू शकतो. परप्रांतीय मजुरांवर होणारी कोट्यवधी रूपयांची उलाढाल ठप्प होऊन अर्थचक्रास खीळ बसू शकते. स्थानिक कामगारांचा हातभार असला तरी जोखीम क्षेत्रात तुलनेने परप्रांतीय जास्त आहेत. एकूणच जालना उद्योगनगरीचे अर्थचक्र पूर्णपणे थांबल्याने हजारो कामगार उद्योग कधी सुरू होणार याची प्रतीक्षा करीत आहेत. सळाई सोबतच इतर पूरक उद्योग तसेच छोटे करखान्यांवर शेकडो मजुरांचा उदरनिर्वाह आहे.

कोरोना संकटाने आर्थिक शिवण उसवत असून या संकटातही उद्योग तसेच इतर व्यवहार सुरळीत राहण्यासाठी वेगळा अभ्यास अथवा प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
रोबोटिक तंत्रज्ञानाचा पर्याय औद्योगिक वसाहतील 40 पेक्षा अधिक सळाई व इतर शेकडो उद्योग आहेत. काही सळई निर्मिती कारखान्यांनी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उद्योग सुरळीत राहू शकतील असे उद्योग क्षेत्रातील काही जाणकार सांगतात. काही सळई उद्योगांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!