यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई…!
रवि माळवी
यवतमाळ , दि. ०८ :- उमरखेड तालुक्यातील लोहारा ग्राम शिवारातील पैनगंगा नदीचे पात्रात असलेल्या रेती घाटावरुन बाभळी बनचिंचोली ता.हदगांव जि.नांदेड या गावातील काही लोक ट्रॅक्टरव्दारे रेतीची चोरटी वाहतुक करत असतांना व रस्त्यात काही अडथळा आहे का याची पाहणी करणे करीता मोटर सायकल वरुन सदर परिसरात पाळत ठेवत असतांना मिळुन आल्याने एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
संदिप विलासराव पोघरे (२१) रा.मनमथस्वामी चौक, हदगांव जि.नांदेड असे पोलीसांनी अटक केलेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. दिनांक ७ मे रोजी पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके व त्यांचे पथकाने अवैध धंद्यावर कार्यवाही करणे करीता पुसद मुख्यालयी हजर असतांना सकाळी ११.२० च्या सुमारास त्यांना मिळालेल्या गोपणीय माहीतीवरुन उमरेखड तालुक्यातील लोहारा ग्राम शिवारातील पैनगंगा नदीचे पात्रात असलेल्या रेती घाटावरुन बाभळी बनचिंचोली ता.हदगांव जि. नांदेड या गावातील काही लोक ट्रॅक्टरव्दारे रेतीची चोरटी वाहतुक करतात व टॅक्टर मालक रस्त्यात काही अडथळा आहे का याची पाहणी करणे करीता मोटर सायकल वरुन सदर परिसरात पाळत ठेवतात अशी माहीती मिळाल्यावरुन पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके यांनी पथकासह माहीतीची खातरजमा करणे करीता उमरखेड येथे रवाना होवून उमरखेड येथुन गौन खनिज चोरी विरोधी पथकाचे नायब तहसिलदार विश्वंबर राण्ेा व त्यांचे कार्यालयातील तलाठी गजाजनन सुरोशे, पंजाब सानप यांना पंच म्हणून सोबत घेवून सदर परिसरात रवाना हावेून मौजा लोहारा शेत शिवार परिसरता असलेल्या पैनगंगा नदीचे काठावर कारवाई करीता गेले असता नदी पात्रात दोन ट्रॅक्टर व तिन मोटारसायकल उभ्या असलेल्या व ट्रॅक्टर मध्ये रेती भरणे सुरु असल्याचे दिसल्याने छापा कारवाई करीता जात असतांना मजुर व ईतर लोक तेथुन पळुन गेले. एक ट्रॅक्टर चाल संदिप पोघरे हा मोक्यावर मिळुन आल्याने त्यांचेकडे रेती वाहतुक संबंधाने चौकशी केली असता रेती वाहतुकीचा कोणताही परवाना आढळून आला नाही. तसेच सदरची चोरटी वाहतुक ही ट्रॅक्टर मालक रामदास पौळ रा.बनचिंचोली ता.हदगाव, रमेश पाटील नरवाडे रा.बाभळी तसेच तोहसिफ फयुम शेख रा.हदगांव जि.नांदेड यांचे करीता करीत असल्याचे चौकशीत समोर आल्याने आरोपी संदिप पोघरे यास ताब्यात घेवून अवैधरित्त्या रेती वाहतुक करण्याकरीता असलेल्या दोन टॅ्रक्टर व ट्रॉली, तीन मोटार सायकल व ईतर साहित्य असा १३ लाख १० हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी संदिप पोघरे व टॅ्रक्टर मालक अशा ४ लोकांविरुध्द उमरखेड पोलीस स्टेशन येथे भादंवि कलम ३७९, ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून फरार मजुर व ट्रॅक्टर मालकांचा शोध सुरु आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक एम.राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके, गोपाल वास्टर, मुन्ना आडे, पंकज पातुरकर, रेवण जागृत सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी पार पाडली.

Post Views: 399