Home जळगाव सुन्नी जामा मस्जिद नियामतपुरा व सुन्नी ईदगाह ट्रस्ट तर्फे निवेदन

सुन्नी जामा मस्जिद नियामतपुरा व सुन्नी ईदगाह ट्रस्ट तर्फे निवेदन

130

जळगाव. एजाज़ शाह

सुन्नी जाम मस्जिद व सुन्नी ईदगाह ट्रस्ट तर्फे कोरोना वायरसचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी रमज़ान ईद च्या खरेदी साठी मार्केट उघडण्याची परवानगी देण्यात येऊ नये… (जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळून )
आपल्या जळगांव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसें दिवस वाढतच असून हे आपल्या साठी ध्योक्याची घंटाच आहे. तसेच मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमज़ान पर्व सुरु आहे. रमज़ान मध्ये शंभर टक्के मुस्लिम कापड, चप्पल, बूट अश्या अनेक वस्तूंची खरेदी करतात. कोरोना चा व्हायरस पासुन जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्यासाठी सामाजिक अंतर (सोशल डिस्टनिंग )खूपच महत्वाची आहे. रमज़ान मध्ये मार्केट आणि कपड्यांची दुकाने सुरु झाल्यास जिल्ह्यातील मुस्लिम बांधव निश्तितच खरेदी करण्यासाठी बाजारात येतील आणि खरेदी करतील सदर खरेदी करतांना सामाजिक अंतर (सोशल डिस्टनिंग )पूर्णपणे पाळले जाणे हे गर्दी मुळे शक्यच नाही. मार्केट मधील दुकाने जर बंद राहतील तर खरेदी करता येणार नाही,त्यामुळे मार्केट मध्ये गर्दी न होता पूर्णपणे सामाजिक अंतर पाळले जाईल,आणि कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढणार नाही. जर जिल्ह्यात मार्केट उघडून मुस्लिम बांधवाना खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली, आणि गर्दी मुळे कोरोना चे रुग्ण वाढले तर याला जबाबदार कोण राहणार ?
म्हणून जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे व मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन कळकळीची विनंति केली कि मार्केट उघडण्यात येऊ नये .जिल्ह्यातील नागरिक सुरक्षित राहतील या वेळी अध्यक्ष सै. अयाज अली , मौलाना जाबीर अमजदि, मौलाना मुबारक हूसैन, मौलाना मोईनुद्दीन वास्ती, मौलाना नजमूल हक, मुफ्ती रेहान रझा, इकबाल वझीर, मौलाना अब्दुल माजिद, मौलाना अब्दुल रहीम, मुख्तार शाह, मौलाना शमीम अख्तर, मौलाना हनीफ रझा, मुफ्ती अब्दुल रशीद, मुफ्ती इंतेखाब अशरफ़ उपस्थित होते