July 4, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

वर्धा जिल्ह्यात शेकडो घरावर लाल बावटा लावून साजरा केला १ मे जागतिक कामगार दिन श्रमजीवी जनतेच्या हक्काचा दिवस – काँमरेड दिलीप उटाण

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – १ मे हा जागतिक कामगार दिवस सबंध जगभर मे दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र दिन देखील आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. जागतिक कामगार दिन हा श्रमजीवी जनतेच्या अधिकाराचा, हक्काचा दिवस असल्याचे मत आयटक राज्य उपाध्यक्ष काँ दिलीप उटाणे यांनी व्यक्त केले.
हक्काची जाणिव झालेले कामगार हे या दिवशी अमेरिकेच्या शिकागो शहरात १८८३ साली एकत्र आले. यावेळी झालेल्या कामगार उठावाच्या स्मृतीचा स्मृतिदिन म्हणून हा दिवस साजरा करतात.शिकागो शहरातील कामगारांनी कामाचे ८ तास करण्यात यावे व कामगारांना किमान वेतन देण्यात यावे या प्रमुख हक्कासाठी उठाव केला. या उठाव मध्ये पोलीस गोळीबारात, अत्याचारात अनेक कामगारांना बलिदान द्यावे लागले. तेथे सांडलेल्या रक्तातून लाल लाल बावट्याचा जन्म झाला. कामगार वर्गाच्या रक्ताने रंगलेला लाल बावाटा कामगार वर्गाच्या हक्काचे प्रतीक बनवा. अनेक कामगार नेत्यांना उठावा बद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.त्यांनाही बलिदान देण्याचा प्रसंग आला. आज जगामध्ये १३७ वर्षांनंतर देखील कामगारांचे अधिकार कामगारांना मिळाले नाहीत. *कार्ल मार्क्स यांनी संपत्ती ही श्रमामधून तयार होते आणि श्रमजीवी जनतेचा देखील तेवढाच संपत्तीवर अधिकार आहे, असा विचार देऊन कामगार वर्गाला त्याच्या हक्काची जाणीव करून दिली*. आजही जगामध्ये विषमतेचने सर्वत्र उच्छाद मांडला आहे.८३ टक्के संपत्ती ती १ टक्का लोकांकडे केंद्रित झालेली आहे. त्यामुळे आजची श्रमिकांना, कामगारांना, कष्टकऱ्यांना त्यांचे हक्क मिळत नाहीत. राब राब राबूनही त्याला त्याच्या गरजा भागवता येत नाहीत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा देखील त्याच्या पूर्ण होत नाहीत. भांडवलशाहीमध्ये या मूलभूत गरजांचा मोठ्या प्रमाणात व्यापार करून, उद्योग करून नफा कमावला जात आहे,मात्र त्याला त्याचे मूलभूत अधिकार मिळत नाहीत. या सर्व चिडीतून कामगार वर्गाने जगभर उठाव केले.समाजवादी राज्याच्या स्थापनेसाठी संघर्ष केला. अनेक देशांमध्ये समाजवादी राजवटी स्थापन झाल्या.
आजही अनेक देशात समाजवादी राजवटी कार्यरत आहेत. आज जगभर कामगारांना, कष्टकऱ्यांना त्याचे हक्क मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. भारतात देखील नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार संघटना स्थापन करून कामगारांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. स्वातंत्र्यपूर्व काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मजूर मंत्रीपद भूषवून कामगारांना त्यांचे फक्त मिळून देण्यासाठी कायदेशीर तरतुदी केल्या. 31 ऑक्टोबर 1920 रोजी भारतामध्ये पहिली कामगार संघटना *आयटक* स्थापन झाली. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटक या संघटनेचे पहिले अध्यक्ष लाला लाजपत राय यांनी अध्यक्षपद भूषवले. त्यानंतर आयटक संघटनेचे अध्यक्षपद स्वातंत्र्य आंदोलनातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी भूषविले. पंडित जवाहरलाल नेहरू ,सुभाषचंद्र बोस,इंद्रजीत गुप्ता, ए बी बर्धन आदी ज्येष्ठ कामगार नेत्यांनी आयटकचे नेतृत्व केले. आयटकच्या व इतर कामगार संघटनांच्या नेतृत्वात देशभर संघटित क्षेत्रातील रेल्वे, बँक, कोळसा, विमा शासकीय व निमशासकीय कर्मचारी तथा अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शालेय पोषण आहार कर्मचारी, बांधकाम कामगार, ग्रामपंचायत कर्मचारी, फुटपाथ दुकानदार व सर्व संघटित असंघटित कामगार वर्ग हा संघटित होत आहे व आपल्या हक्कासाठी आवाज बुलंद करत आहे, चळवळ चालवत आहे. कामगारांना किमान वेतन, बोनस, ग्रॅज्युटी, पेन्शनचे अधिकार कामगार लढ्यातून त्यांना मिळाले आहेत. कामगारांचा प्रत्येक कायदा हा संघर्षातून तयार झालेला आहे. प्रत्येक कामगार कायद्याला स्वतंत्र इतिहास आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आयटकने ऐतिहासिक भूमिका पार पाडली. मुंबईमध्ये नाविकांनी बंड केले. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात मुंबईतील गिरणी कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. आयटकच्या नेतृत्वात त्यावेळी हा लढा झाला. त्यानंतर अनेक कामगार संघटना देशांमध्ये स्थापन झाल्या, मात्र आयटक आजही शंभर वर्षात पदार्पण करून शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. या शताब्दी वर्षात कोरोना महामारीमुळे सार्वजनिक उत्सव साजरा करणे शक्य नाही, मात्र चळवळीच्या स्मृती ह्या निरंतरपणे कामगार कष्टकरी वर्गाच्या स्मरणात आहेत आणि त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देत आहेत. कामगारांना त्यांचे अधिकार त्याग, संघर्ष आणि बलिदानातून मिळालेले आहेत. त्यांना कोणतेही अधिकार हे खैरात म्हणून मिळालेले नाह,मात्र आज कामगार कायद्यावर कुटाराघात करण्याचे कारस्थान सुरू आहे. मात्र या हल्ल्याला देखील परतवून लावण्याची शक्ती कामगार वर्गात आहे
. आज जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांची एकजूट हाच सर्वोत्तम उपाय ठरणार आहे. जगातील कामगारांनो एक व्हा!जागतिक कामगार दिनाचा नारा आहे. हाच नारा आजच्या काळात बुलंद करण्याची गरज आहे.
*१ मे १९६० साली महाराष्ट्राची स्थापना झाली संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्या १०७ हुताम्य शहिद झाले त्यापैकी १०५ कम्युनिस्ट कामगार शेतकरी होते हे विशेष* या शहिदाना घरोघरी अभिवादन करण्यात आले
आज जगामधील कोरोना महामारी च्या संकटाने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की, *मानवजातीला अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण दिल्याशिवाय मानवता ही शिल्लक उरणार नाही*. म्हणून मानवतेचे रक्षणासाठी कामगार वर्गाने एकत्र यावे हाच मे दिनाचा संदेश ठरणार आहे.आयटक राज्य उपाध्यक्ष :काॅ.दिलीप उटाणे यांनी काँन्फरस व्दारे वर्धा जिल्ह्यातील आयटक सदस्यांना दिला
आर्वी तालुक्यात ३०५ आष्टी ११५ कारंजा २८५ सेलू ११३ समुद्रपूर १९५ हिंगणघाट २९८ वर्धा ३६७ देवळी १९१ कामगारांनी आपल्या घरावर लाल बावटा लावून तसेच आयटक कामगार केंद्र बोरगाव( मेघे) येथे काँ सुरेश गोसावी तर देवळी आयटक कार्यालयात भानुदास झाडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!