Home विदर्भ महाराष्ट्र दिनानिमित्त इनरव्हील क्लब यवतमाळ (हिरा) तर्फे गरजूंना धान्य किटचे वाटप

महाराष्ट्र दिनानिमित्त इनरव्हील क्लब यवतमाळ (हिरा) तर्फे गरजूंना धान्य किटचे वाटप

382

यवतमाळ – यवतमाळ शहरामध्ये कोरोना संसर्ग प्रमाण वाढले असून सततच्या लॉकडाउनमुळे गोरगरीबांचे हाल होत असून 1 मे महाराष्ट्र दिन (कामगार दिना निमित्त) इनरव्हील कल्ब ऑफ यवतमाळ (हिरा) च्या वतीने गरजु गरीब 21 महिला कामगारांना अन्नधान्याची किट वाटप करण्यात आली. या किट मधील अन्नधान्य 10 दिवस पुरेल या प्रमाणे देण्यात आले. वाघापूर येथील नंदुरकर महाविद्यालयाच्या प्रांगणात गरजू गरीबांना धान्य किटचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी ईनरव्हील क्लब ऑफ यवतमाळ्च्या अध्यक्षा रितू गायकवाड, प्रकल्प अधिकारी प्रियंका बिडकर, अश्‍विता वाढवे, वर्षा पडवे सह गरजू गरीब महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या प्रसंगी महिला कामगारांना कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.