Home जळगाव रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे ३० गरीब गरजू व विधवा...

रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे ३० गरीब गरजू व विधवा महिलांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप

190

रावेर ( शरीफ शेख )

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन असल्याने ज्यांचे हातावर पोट आहे. हाताला काम नाही व रेशन दुकानातुन धान्य मिळत नाही.अशा लोकांना जिवन आवश्यक वस्तुचे किट तयार करुन गरीब व गरजु लोकांना दानशूर व्यक्तीतीनी पुढाकार घेऊन वाटप करावे असे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यानी आवाहन केले होते या आवाहानाला प्रतिसाद म्हणून रावेर येथील संघरक्षक उर्फ धुमा भाऊ तायडे यांनी ज्यांचे हातावर पोट असलेल्या ३० गरीब गरजू व विधवा महिलांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे ज्यांचे हातावर पोट असलेल्या हाताला काम नसलेटल्या व रेशनचे धान्य न मिळणाऱ्या ३० गरीब गरजू व विधवा महिलांना जीवनावश्यक वस्तु यात गहू, तांदूळ, साखर, चहा पावडर, मुंग डाळ, मीठ मिरची, तूर डाळ, या वस्तूंचे किट तयार करून प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, मुख्याधिकारी न.पा. रावेर रवींद्र लांडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत व यांच्या हस्ते 30 गरीब व गरजू व विधवा महिलांना वाटप करण्यात आले. या वेळी युवा सामाजिक कार्यकर्ते संघरक्षक उर्फ धुमा भाऊ तायडे, रावेर मंडळ अधिकारी सचिन पाटील, रावेर तलाठी डी. व्ही. कांबळे, वाहन चालक उमेश तळेकर व अरविंद बोरसे, पत्रकार जयंत भागवत, शालीक महाजन, फुले, शाहू ,आंबेडकर, बहुउद्देशीय सेवाभावी संस्थचे अध्यक्ष पत्रकार राजेंद्र अटकाळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष सावन मेढे, खजिनदार व आपले सरकार सेतू केंद्र तहसिल कार्यालय रावेर व्यवस्थापक धनराज घेटे, सचिन तायडे, अनिता तायडे, गणेश तायडे, तुषार निकम, समाधान तायडे यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील महिला व पुरुष सोशल डिस्टनसिंग चे पालन करून व तोंडाला मास्क लावून उपस्थित होते.