July 7, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

कोरोनाग्रस्तांसाठी आलेले तीन ट्रक अन्नधान्याचे वाटप सुरु

खासदार भावनाताई गवळी यांनी यवतमाळ जिल्हयातील कोरोनाग्रस्त गरीब नागरीकांसाठी तीन ट्रक अन्नधान्याचे पॅकेट पाठविले आहे. दरम्यान या पॅकेट चे वाटप सुरु करण्यात आले असून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात खासदार भावनाताईंनी आतापर्यन्त 20 हजार अन्नधान्य पॅकेटचे वाटप केले आहे.

यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघामध्ये धान्याच्या हजारो किट तयार करून वाटप करण्याचे कार्य सुरु आहे. वाशिम मध्ये 10 हजार किट वाटप करण्यात आल्या आहे. यवतमाळ येथे नुकतेच 2200 किट उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या किट चे वाटप शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा सह संपर्क प्रमुख संतोष ढवळे, शहरप्रमुख पिंटू बांगर यांनी केले. दरम्यान अनेक गरीब नागरीक खासदार भावनाताई गवळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात येऊन त्यांनी आपली आपबिती कथन केल्याने आता पुन्हा तीन ट्रक भरुन आठ हजार किट पाठविण्यात आल्या आहे. नेर, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, यवतमाळ, पुसद, दिग्रस या ठिकाणी कार्यकर्त्यांचा माध्यमातून किटचे घरपोच वाटप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोरोनाग्रस्त भागात सर्वेक्षणाचे कार्य करणा-या अंगनवाडी सेविकांना सुध्दा सुरक्षा किटचे वाटप खासदार भावना ताई गवळी यांनी नुकतेच केले आहे. लोकांची गर्दी होणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्था विस्कळीत होणार नाही अशा पध्दतीने अन्नधान्याचे वाटप करण्याच्या तसेच ठीक ठिकाणी प्रशासनाला मदत करण्याच्या सुचना खासदार भावनाताई गवळी यांनी शिवसैनिकांना दिल्या आहे. अन्नधान्य किटचे वाटप करण्यासाठी शिवसेनेचे उपसंपर्क प्रमुख संतोष ढवळे, शिवसेना शहर प्रमुख पिंटु बांगर, राजु नागरगोजे, गुणवंत ठोकळ, अतुल गुल्हाणे, दिनेश इंगळे, सुरेश ढेकळे, सुनिल डिवरे, सरीता यादव, शिलत उरकुडे, संगीता पुरी, मंदाताई गाडेकर, रवि राऊत, प्रविण पाचकवडे, विनोद राऊत, योगेश वर्मा, सोनाली काळे, कुणाल काळे, संतोष सोनकुसरे, किशोर बडे, पदमाकर काळे, बाळु दराडे, गणेश ठाकरे, राहुल गंभीरे, बाळु वळस्कर, भुषण काटकर, बाप्पा शर्मा, अमित बिहाडे, सागर बिहाडे, जीवन बिहाडे, अक्षय पाखरे सह अनेक शिवसेना पदाधिकारी परीश्रम घेत आहे.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!