Home विदर्भ ग्रामपंचायत निंबि खुर्द येथे सर्व कुटूंबाला सँनिटायझर,मास्क, जिवनङ्राँप व डेटाँल साबण किट...

ग्रामपंचायत निंबि खुर्द येथे सर्व कुटूंबाला सँनिटायझर,मास्क, जिवनङ्राँप व डेटाँल साबण किट वाटप करणारी बार्शीटाकळी तालुक्यातील एकमेव ग्राम पंचायत आहे.

115

बार्शीटाकळी – पवन जाधव

अकोला – कोरोनाने संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेले असताना आपला देशही त्यामधून सुटलेला नाहीये.कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासन व इतर सर्वच स्थरातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केल्या जात आहेत.हिच बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत निंबी खूर्द यांच्यावतीने संपूर्ण गावामधे दि.२२/४/२०२० रोजी स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या किटचे वाटप करण्यात आले.किटमध्ये सँनिटायझर,मास्क, जिवनङ्राँप व डेटाँल साबण या सर्व आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.
कोरोनाच्या विषाणू चा प्रादुर्भाव संपूर्ण जगाला विळखा घालून बसलेला आहे.कोरोनाचे भयंकर संकट कसे दूर करावे यासाठी जगामध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत.परंतु जागतिक आरोग्य संघटनेने या संकटापासून वाचण्यासाठी आपण आपले हात वेळोवेळी स्वच्छ धुवावे,घराच्या बाहेर पडल्यानंतर तोंडाला मास्क बांधावे असे उपाय सुचवलेले आहेत.आपल्याला एकदम साधे वाटणारेच उपाय आपल्याला कोरोनापासून वाचवू शकतील हेच सत्य आहे.ह्याच सर्व गोष्टीची जाणीव ठेऊन निंबी खूर्द येथील युवा सरपंच रोशन पाटिल यांनी
[सँनिटायझर,जिवनङ्राँप, मास्क ,डेटॉल साबण या सर्वच वस्तुची किट बनवून गावातील प्रत्येक कुटुंबाला किटचे वाटप केले.सोबतच घरात राहून स्वताचे,गावाचे,देशाचे रक्षण करा असा सल्लाही दिला.
विशेष म्हणजे अशा किटचे वापट करणारे निंबी खूर्द हे ग्रामपंचायत बार्शिटाकळी तालुक्यातील पहिलेच ग्रामपंचायत ठरली आहे असून
किटचे वापट करतेवेळी सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन केलेले दिसले.यावेळी सरपंच रोशन पाटील,उपसरपंच सौ.नंदाताई थोरात,सचिव श्री.शंकर डाखोरे,पोलीस पाटील विक्रमसिंह देशमूख,तंटामूक्ती अध्यक्ष श्री दिलीपराव पाटील,अंगणवाडी सेविका सौ.शैला राऊत,आशा सौ.वर्षा तायडे,जेष्ठ नागरिक श्री.जनार्धनराव गावंडे व गावकरी मंडळी उपस्थित होती.

जो आज घरी बसेल तोच उद्या जिंकेल.मीच माझ्या देशाचा आणि माझ्या कुटुंबाचा रक्षक आहे.असे मनाशी ठरवून सर्व नागरीकांनी आपल्या घरातच रहावे,शासनाच्या नियमाचे पालन करावे तसेच वेळोवेळी आपले हात साबणाने स्वच्छ धुवावे जेणेकरून कोरोनासारख्या महाभयंकर राक्षसाला आपण कायमचे संपवू शकू.

यूवा सरपंच :- रोशन दिलीपराव पाटील
निंबी खुर्द ता बार्शीटाकळी