Home मुंबई उच्चविद्या विभूषित, उच्च पदस्थ, आर्थिक भक्कम, परिवर्तनवादी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते, पण एकदम...

उच्चविद्या विभूषित, उच्च पदस्थ, आर्थिक भक्कम, परिवर्तनवादी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते, पण एकदम साधे डाॅ. आनंद तेलतुंबडे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असूच शकत नाहीत – प्रकाश डबरासे

237

सुरेश वाघमारे

मुंबई – डाॅ. आनंद तेलतुंबडेंना केलेली अटक निस्चितच निषेधार्थ आहे. आपण सर्व आंबेडकरवाद्यांनी या अटकेचा निषेध केलाच आहे. आणि, यापुढेही जितका निषेध किंवा धिक्कार करू तितका तो कमीच आहे.

आनंद तेलतुंबडे, एका सर्व साधारण बौध्द कुटूंबात जन्म घेतलेले उच्च विद्याविभूषीत, अभ्यासू, विचारवंत, आर्थिक भक्कम, उच्चपदस्थ, इतकेच नव्हे तर समाजाला व देशाला नविन दिशा देण्याची क्षमता असणारे परिवर्तनवादी व्यक्तिमत्व. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने भारतातच नव्हे तर परदेशातही आपल्या अभ्यासू व्यक्तीमत्वाचा ठसा उमटविला आहे.

2003 साली, मी आयोजित केलेल्या, वाशी, नवी मुंबई येथील कार्यक्रमात बाबासाहेबांचे आर्थिक धोरण या विषयावर प्रबोधन करण्यासाठी ते प्रमुख वक्ते म्हणून आले होते. मी व माझा मित्र आयु. शरद मोडक (डाॅ. तेलतुंबडेचे आतेभाऊ) परिवारासह त्यांच्या घरी तीन चार वेळा भेट दिली आहे. मी व शरद मोडक एकदा त्यांच्या वरळी येथील घरी गेलो असता, त्यांच्या घरी जेवन केले. बाबासाहेबांची नात, आद. रमाताई तेलतुंबडेंच्या घरी त्यांनी वाढलेले जेऊन मन भारावून गेले. रमाताई, आम्हाला आम्हच्या परिवारासह राजगृहात अगदी आतल्या घरात घेऊन गेल्यात. तेथे असलेल्या बाबासाहेबांच्या वस्तु व त्यांची बसण्या उठण्याची जागा, टेबल, इत्यादींशी ओळख करून दिली. या निमित्ताने, तेलतुंबडेसाहेबांचा व रमाताईचा अत्यंत साधेपणा व मनमिळाऊ स्वभाव मी स्वतः अनुभवला आहे.

माझा पुर्ण विश्वास आहे की, इतके गुणसंपन्न, परंतू एकदम साधे (down to earth) व्यक्तिमत्व की, ज्यांचा स्वतःचा देश परदेशात प्रभाव आहे, ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे असूच शकत नाहीत. त्यामुळे, त्यांचा अशा भयंकर गुन्ह्यात तिळमात्रही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभाग असने शक्यच नाही. इथल्या अमाणविय मनुवादी पिलावळीने आधारहीन व सुडबुध्दीने त्यांच्यावर गुन्हे लावून, त्यांना नाहक अडकविले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

मित्रहो, हा जरी आपल्या भावनेचा प्रश्र असला तरी, तो आता कायदा व न्यायालयीन प्रक्रियेचा भाग झाला असल्याने, आपल्याला व्यावहारिक दृष्टीकोन ठेऊन तो स्विकारलाच पाहिजे. मागील दोन वर्षापासून काही विचारवंत अशाच केसेस मध्ये फसले आहेत. त्या केसेसचा निकाल आज पर्यंत लागला नाही. त्यात आता भर पडली ती, डाॅ. आनंद तेलतुंबडे सरांची. बहुजन नेते बाळासाहेब आंबेडकरांसारखे प्रभावी, खंबीर व विधीज्ञ पाठीशी असतांना, आनंद तेलतुंबडेसरांवर ही वेळ आयलाच नव्हती पाहिजे. पण आली. आपण संविधानाचा आदर करणारे न्यायप्रिय लोकं आहोत. सद्यस्थितीतील सत्य स्विकारून, आपण भावनांना थोडी लगाम घातली पाहिजे. वरील सर्व केसेस मागील दोन वर्षापासून प्रलंबित असल्याने व इतरही काही विचारवंत यांत गोवले गेले असल्याने, मला असे वाटते की, या सर्व केसेसची सुनावणी जलद गतीने करून, शासनाने याचे दुधका दुध व पाणीका पाणी त्वरीत करने अत्यावश्यक आहे. शासन असे कोणालाही असे नाहक डांबू शकत नाहीत, हे आपण त्यांना कायद्याच्या चौकटीत राहुन दाखवून दिले पाहिजे..

वैचारिक मतभेदांचे निरसन विचारांनेच केले पाहिजे. सुडबुध्दीने अशा अमाणविय व्यवहारातुन नव्हे. सुडबुध्दिचा पुन्हा धिक्कार करून, डाॅ. आनंद तेलतुंबडे व इतरही काही मानवतावादी विचारवंत जे या केसेस मध्ये फसले आहेत, ते लवकरात लवकर बाहेर पडावे अशी अपेक्षा प्रकाश डबरासे यांनी आपल्या अपेक्षा बोलताना व्यक्त केल्या