Home विदर्भ
149

सामाजिक बांधिलकी जपणारे ग्राम पुंडा

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 31हजार जमा

अकोट : प्रतिनिधी/ देवानंद खिरकर

सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोनाचा हाहाकार सुरू असून देशातील अर्थ व्यस्था खालावली आहे. कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, देशात संकटांनी थैमान घातले असून पोलीस प्रशासन, वैद्यकीय सेवा, तसेच शासन प्रशासन यांच्या स्तरावर कोरोना या संसर्ग जन्य रोगाला देशातून पळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून, अशा काळात प्रत्येकाने आपला कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे. असा संदेश देत अकोट तालुक्यातील पुंडा गावातील पुरातन वारसा लाभलेल्या नंदिकेश्वर संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये 31 हजार रुपयांचा निधी जमा केला असून सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच नंदिकेश्वर संस्थांनी कार्य केलेले असून, संवेदनशीलता जपत अशा काळात कोरोनाचे संकट दूर व्हावे या उद्देशाने नंदिकेश्वर संस्थांच्या वतीने हा मदतनिधी थेट ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा केला आहे.