Home महत्वाची बातमी आर्वीत नववधु वर विवाह मुहूर्तावर अडकले विवाह बंधनात…!

आर्वीत नववधु वर विवाह मुहूर्तावर अडकले विवाह बंधनात…!

129

आर्वीत पार पडला संचारबंदीचे व लाॅकडाऊनचे पालन करून अनोखा विवाह सोहळा….

वर्धा – जिल्ह्यात आर्वी तालुका येथील सावजी टेकाम यांची मुलगी गीता व खैरवाडा येथील अंबादास कोैरती यांचा मुलगा हरीदास या दोद्यांचा विवाह समारंभ १५ एप्रिल ठरला होता.

मात्र अशातच कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर देशाला लॉक डाऊन व जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याने हा विवाहसोहळा रद्द होण्याची भीती टेकाम व काैरती या दोन्ही कुटुंबांत निर्माण झाली होती. जस जसी विवाह सोहळ्याची तारीख जवळ येत होती. तस तशी दोन्ही कुटुंबांची चिंता वाढत गेली. शेवटी समाज सेवक जाचक यांनी उपविभागिय अधिकारी हरीष धार्मीक यांच्याशी चर्चा केली. समाज सेवक सुधिर जाचक यांनी हि बाब आर्वी चे उपविभागिय अदिकारी हरीष धार्मीक यांच्या निदर्शनात आणुन दिल्यानंतर त्यांनी समाज सेवक सुधिर जाचक यांच्याकडे हा विवाहसोहळा मुहूर्तावर संचारबंदीचे पालन करून शोशल डिस्टन्स ठेवून पार पाडण्याची जबाबदारी सोपवली. जाचक यांनी अवद्या सहा सात लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सचे भान ठेवून संचारबंदी चे उल्लंघन न होवू देत नवरी गीता व नवरदेव हरिदास यांच्या चेहऱ्यावर मास्क लावून ठरलेल्या विवाह मुहूर्तावर पंचवटि येथे दोद्यांनाही विवाह बंधनात बांधून अनोखा विवाह समारंभ पार पडला. या क्षणी मुलामुलींच्या व आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी मुला मुलीचे आई-वडील उपविभागिय अधिकारी हरीष धार्मीक, सुधिर जाचक हे हे काही अंतरावर उभे राहून विवाहाचे साक्षी ठरले.

बाईट:- हरीष धार्मीक (उपविभागिय अधिकारी आर्वी)

प्रतिनिधी
रविन्द्र साखरे सह ईकबाल शेख
आर्वी. वर्धा.