Home मराठवाडा गुटखा, पानमसाला विक्री कार्यवाहीत चार प्रकरणात १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त ,

गुटखा, पानमसाला विक्री कार्यवाहीत चार प्रकरणात १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त ,

337

*नांदेड दि. १५ : राजेश भांगे*
अन्न सुरक्षा मानद कायदा २००६ नियम व नियमन २०११ अन्वये गुटखा, पानमसाला व तत्सम पदार्थाची विक्री करणाऱ्यावर कार्यवाही तसेच प्रतिबंधीत अन्न पदार्थासोबतच वाहनांची जप्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात नुकत्याच करण्यात आलेल्या चार प्रकरणात प्रतिबंधीतसाठा ७ लाख ७० हजार ७४० रुपये व तीन वाहने किंमत २ लाख ५५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नांदेड येथील अन्न सुरक्षा अधिकरी स. वि. कनकावाड यांनी ४ एप्रिल २०२० रोजी माहूर तालुक्यातील पोलिस स्टेशन सिंदखेड येथे जावुन पोलिसांनी ताब्यात घेतलेला प्रतिबंधीत अन्न पदार्थ व दुचाकी वाहन एकुण किंमत ४२ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन या प्रकरणी जावेद बरकत खिच्ची रा. वाई बाजार यांच्या विरुध्द अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल केला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी सु. द. जिंतुरकर यांनी ८ एप्रिल रोजी धर्माबाद मे. राजराजेश्वर किराणा दुकान बाळापुर रोड धर्माबाद यापेढीवर धाड टाकुन प्रतिबंधीत अन्न पदार्थ ४ लाख ५९ हजार १९० रुपयाचा साठा जप्त करून या प्रकरणी रविकुमार शंकरराव कोडावार व राजकुमार शंकरराव कोंडावार याच्या विरूध्द अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

देगलूर तालुक्यातील पोलिस स्टेशन मरखेल येथे ११ एप्रिल रोजी मरखेल पोलिसांनी ताब्यात घेतलेला प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा साठा १ लाख २४ हजार ८०० रुपयांचा व वाहन किंमत २ लाख रुपयेचा साठा जप्त करुन या प्रकरणी शेख जावेद शेख समदानी यांच्या विरुध्द अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

तसेच प्र.म. काळे यांनी अर्धापूर पोलिस स्टेशन अर्धापुर येथे जावुन ११ एप्रिल रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलेला प्रतिबंधीत अन्न पदार्थ किंमत ९ हजार ७५० रुपये व दुचाकी वाहन किंमत ३५ हजार रुपये असा एकुण ४४ हजार ७५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन या प्रकरणी शेख सोहेब शेख सलीम व फसिउददीन काजी यांच्या विरूध्द अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल केला आहे.

ही कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी यांनी सहायक आयुक्त (अन्न), म.रा. अन्न व औषध प्रशासन तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

प्रतिबंधीत अन्न पदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांनी छुप्या, चोरटया पध्दतीने प्रतिबंधीत अन्न पदार्थांची विक्री, उत्पादन, साठा, वाहतुक करु नये अन्यथा कठोर कायदेशीर कार्यवाही समोरे जावे लागेल, असे आवाहन, नांदेडचे अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त (अन्न) तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.