Home मराठवाडा उमरी तालुका केमीस्ट अॅन्ड ड्रगीष्ट असोसिएशन चा अभिनव उपक्रम

उमरी तालुका केमीस्ट अॅन्ड ड्रगीष्ट असोसिएशन चा अभिनव उपक्रम

243
0

नांदेड, दि.७ ( राजेश भांगे ) – गेली काहि दिवसांपासून सबंध देशात व महाराष्ट्रात लॉकडाऊन चालू आहे. या लॉकडाऊन मध्ये सामान्य माणसांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर व सर्व कर्मचारी , खाजगी डॉक्टर, मेडीकल, नगर परीषदेचे सर्व कर्मचारी, पोलीस प्रशासन व सर्व कर्मचारी, असे विविध क्षेत्रातील शासकीय व प्रशासकीय कर्मचारी आपल्या जिवाची तमा न बाळगता डॉक्टर वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून रुग्णांची अविरत सेवा करत आहेत.

यात आपले पोलीस बांधव भर उन्हात चांगल्या प्रकारे बंदोबस्त ठेवत आहेत व त्यात नगर परीषदेचे कर्मचारी सुध्दा शहरात दुर्गंधी न पसरू देता शहर स्वच्छ ठेवत चांगली कामगिरी बजावत आहेत. अशा दिवस रात्र अविरत सेवा बजावणार्या कर्मचार्यांसाठी प्रत्येक क्षणी उमरी तालुका केमीस्ट असोसिएशन नेहमीच कोणत्या न कोणत्या माध्यमातून मदत करीत असते, यावेळी सुध्दा त्यांच्यासाठी आपल्याही योगदानाची भर असायला हवी या हेतूने उमरी तालुका केमीस्ट अॅन्ड ड्रगिष्ट असोसिएशन चे अध्यक्ष शंकर धोंडबाराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व केमीस्ट बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत सर्वांना सुमारे २०० सॅनीटायजर वाटपचे केले.
यावेळी ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ डॉ. माधव विभुते साहेब, डॉ‌. चव्हाण, बालरोग तज्ज्ञ डॉ. चंदापुरे, डॉ. जाधव, डॉ. भालेराव, अशोक मामीडवार, गंगामोहन शिंदे,
उमरीचे पोलीस निरीक्षक अनंत्रे व सर्व पोलीस कर्मचारी, उमरी नगर परीषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे व सर्व कर्मचारी बांधव, खाजगी दवाखान्यातील डॉ. बि.एस. देशमुख बारडकर , डॉ. जाधव , डॉ. वट्टमवार, मेडीकल च्या माध्यमातून अविरत सेवा देणारे उमरी तालुका केमीस्ट संघटनेचे सचिव कृष्णाभाऊ कोहीडवार, गोविंद आप्पा नलबलवार, श्रीनिवासन निलावार, श्रीपाद पाटील लामकाणीकर, सचिन कानोडे, सचिन निलावार, निलेश पोकलवार, आदी केमिस्ट् बांधव उपस्थित होते.
या सामाजिक कार्याबद्दल नगर परीषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे व पोलीस निरीक्षक अनंत्रे यांनी उमरी तालुका केमिस्ट संघटनेचे कौतुक केले.