Home विदर्भ अकोट तालुक्यात सुरु असलेले प्रदेश युवक काँग्रेस आयोजित रक्तदान शिबिराचे बोर्डी येथे...

अकोट तालुक्यात सुरु असलेले प्रदेश युवक काँग्रेस आयोजित रक्तदान शिबिराचे बोर्डी येथे समारोप…..

81
0

बोर्डी येथे रक्तदान शिबिर…..

देवानंद खिरकर

संपुर्ण महाराष्ट्रात ब्लड बँकेत रक्ताचा तूटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे राज्यातील नागरीकांनी रक्तदान करावे असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले होते.शहरात शुक्रवारी ब्लड व्यँन च्या माध्यमातून गर्दीला टाळता ठिक ठिकाणच्या परिसरात जाऊन रक्तदान शिबिराचे आयोजन प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आले.तसेच संपुर्ण महाराष्ट्रात प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने हा उपक्रम राबविल्या जात आहे.प्रत्येक रक्तदान शिबिरास्थळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतल्या गेली.शिबिरस्थळी सर्वप्रथम आलेल्या युवकांना हात धुण्यासाठी डेटालची तसेच नंतर सेनीटाइझर ची व्यवस्था करण्यात आली.सदर शिबिरामधे दुसर्या दिवशी परंत नागरिक व महिला वर्ग सुध्दा सहभागी होवुन 219 च्या वर रक्तदात्यांनि रक्तदान केले.शिबिराचा आज बोर्डी येथे समारोप झाला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव निनाद मानकर,अकोट विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रतिक गोरे,अकोट शहराध्यक्ष सारंग मालाणी,कुणाल जोत,अतुल भालतीडक,चेतन गुरेकार,शुभम जयस्वाल,नितीन गुरेकार,महेश कुरवाडे,दिपक खिरकर,देवानंद खिरकर,शाम आतकड,वैभव आतकड,प्रमोद काळणे,गोपाल वाळके,सोमेश कूरवाडे,सचिन डफडे,सचिन अग्रवाल,करण पिंजरकर,पवन डफडे,आदींनी परीश्रम घेतले.

Unlimited Reseller Hosting