Home जळगाव
96
0

जळगाव महापालिका प्रशासनाने जळगाव शहरातील कचऱ्याचा प्रश्न त्वरित सोडवावा ,

अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस महानगर तर्फे आंदोलना चा इशारा ,

एजास शाह

जळगाव ,

जळगाव महापालिका प्रशासनाने जळगाव शहरातील कचऱ्याची समस्या न सोडवल्यास व यासंबंधी दिल्या गेलेल्या वॉटरग्रेसचा ठेका रद्द करावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगरतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा प्रशासनाला देण्यात आला.

महापालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन मंत्री व भाजपचे संकटमोचक म्हणून स्वतःला मिरवून घेणाऱ्या गिरीश महाजनांनी जळगाव शहरातील कचऱ्याच्या संदर्भात मोठमोठ्या वलग्ना केलेल्या होत्या. त्यासंबंधी या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ‘वॉटरग्रेस’ नावाच्या कंपनीला पालिकेकडून अधिकृतरित्या ठेका ही दिलेला होता. या सर्व प्रकारात संबंधित कंपनीकडून हा ठेका देण्यात यावा म्हणून काही कोटींची दलाली झालेली होती हा आरोप काही दिवसांपूर्वी झालेला होता. मात्र यानंतर शहरातील कचऱ्याची समस्या सोडवण्यात वॉटरग्रेस कंपनीला काडीचंही यश आलेलं नाही. शहराच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात कचरा साठवलेला दिसतोय. याबाबत उपाययोजना व्हावी म्हणून सामान्य नागरिकांतर्फे वेळोवेळी पालिका प्रशासनाकडे व या कंपनीकडे विचारणाही करण्यात आली. मात्र कुठलंही समाधानकारक काम झालेलं नाही.

पुरेशी यंत्रणा नसताना वॉटरग्रेसला हे कंत्राट दिल्यानंतर नियमितपणे मक्तेदारास कंत्राटातील अटींची पूर्तता करण्यास प्रशासनाकडून सूचना दिल्या गेलेल्या होत्या.त्यानंतरही याकडे सातत्याने दुर्लक्ष होत गेलं. दरम्यान शहरातील नागरिकांच्या समस्या वाढतच असल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगरतर्फे जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्या नेतृत्वात पालिका प्रशासनाविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. व यासंबंधी मनपा आयुक्त मा.सतीश कुलकर्णींना निवेदन सादर करण्यात आलं.

निवेदनात केल्या गेलेल्या मागण्या.
१) येत्या ३ दिवसांत जळगाव मनपात विशेष महासभा घेऊन वॉटरग्रेस कंपनीचा ठेका रद्द करण्याबाबतचा ठराव सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन करावा.
२) मनपा आयुक्तांनी व महापौर यांनी संयुक्तिकरित्या सोबत येऊन महासभा घेण्याचं लेखी आश्वासन जनतेला द्यावं.
३) महासभा न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगरतर्फे पालिकेस कुलूप लावून अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात येईल व त्यासाठी प्रशासन जबाबदार राहील.
४)तसेच शहरातील रस्ते, कचरा या मूलभूत समस्या मनपा व सत्ताधारी पुरवू शकत नसतील तर जळगावकरांनी पालिकेला कर का म्हणून द्यावा?
५)वॉटरग्रेस कंपनीला कोण पाठिशी घालत आहे याची यथासांग चौकशी होऊन त्यावर कारवाई करण्यात यावी.
६) स्वतःच्या पक्षाची सत्ता मनपात असताना पालिकेलाच हा ठेका रद्द करण्याबाबत अधिकार असताना त्याच पक्षाचे स्थानिक आमदार विधानसभेत हा प्रश्न उपस्थित का करतात?

या प्रसंगी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस महानगरचे सचिव मा.अँड.कुणाल पवार, माजी महापौर मा.गणेश सोनवणे, महिला जिल्हाध्यक्षा सौ.कल्पनाताई पाटील, युवक महानगर जिल्हाध्यक्ष मा.स्वप्नील नेमाडे, सौ.मीनल पाटील, सौ.लताताई मोरे, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष मा.मजहर पठाण, सुशील धांडे, रवींद्र देशमुख, गणेश निंबाळकर, रियाज काकरकर, विशाल देशमुख, किशोर सूर्यवंशी, सूरज पाटील, अक्षय वंजारी, गौरव वाणी, अमोल कोल्हे, दिलीप सिररवाढ,दुर्गेश पाटील, मोहसीन शेख, अकिल पटेल, तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित केला.
एजाज़ शाह 7385612883 समस्या न सोडवल्यास व यासंबंधी दिल्या गेलेल्या वॉटरग्रेसचा ठेका रद्द करावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगरतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा प्रशासनाला देण्यात आला.

एजाज़ शाह 7385612883