Home मराठवाडा कंधार शहरात ट्राव्हल्सचे ब्रेकफेल झाल्याने घडले भिषण अपघात, प्रत्यक्ष दर्शिंचे उडले थरकाप

कंधार शहरात ट्राव्हल्सचे ब्रेकफेल झाल्याने घडले भिषण अपघात, प्रत्यक्ष दर्शिंचे उडले थरकाप

154

नांदेड , दि. १३ :- ( राजेश भांगे ) –
कंधार येथे १२ मार्च रोजी विवाह सोहळ्यासाठी जिंतूर येथील वऱ्हाडी मंडळी ट्रॅव्हल्स ने आले असता संत नामदेव महाराज मंगल कार्यालय येथे लग्न लावून परत जात असतानाच दुपारी साडे चारच्या सुमारास शहरातील मुख्य रस्त्याच्या उताराला स्लिपरकोच ट्रॅव्हल्स चे ब्रेक नादुरुस्त झाले व मुख्य रस्त्याने भरधाव वेगात सुटलेल्या ट्रॅव्हल्सने अनेकांना उडविले , गंभिर जखमी केले.

तरी चालकाने प्रसंगावधान दाखवत महाराणा प्रताप चौकात बांधलेल्या कठड्याला हि ट्राव्हल्स धडकवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ह्या ट्राव्हल्सने रस्त्यावर असलेले अनेक वाहन चालक गंभीर जखमी झाले. सर्वप्रथम ST बसला व नंतर उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे यांच्या च्या गाडिला व हिरोहोंन्डा मोटार बाईकला त्या नंतर ट्रॕक्टर ला मोठी धडक देऊन महाराणा प्रताप चौकाच्या कठड्याला उडविले व दुसऱ्या बाजुने हि ट्राव्हल बाहेर निघाली ह्या सगळ्या थरकाप उडविणाय्रा प्रकारा नंतर जखमींना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड च्या शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आले असले तरी आठ जनांची प्रक्रती गंभिरअसल्याचे समजले. जखमीं मध्ये दैनिक सकाळचे पत्रकार व उर्दु प्राथमिक शाळेचे शिक्षक तसेच ST चालक यांचा समावेश असुन. अपघाताची बातमी कळताच शहारातील सर्व डाॕक्टर्सने तातडिने जखमिंच्या उपचारासाठी उपस्थित राहुन आपले कर्तव्य बजावल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. कंधारवासी सुद्धा यावेळी घटना स्थळी मतदतीसाठी तात्काळ सरसाल्याचे दिसुन आले.