Home मराठवाडा ठाकरे सरकारचा मोठा निर्णय , औरंगाबाद विमानतळाचं नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज...

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय , औरंगाबाद विमानतळाचं नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याची मान्यता

113
0

नांदेड , दि.६ ; ( राजेश भांगे ) –
औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्यात आले (Aurangabad Airport Name Change) आहे. आज (५ मार्च) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतची घोषणा विधानसभेत केली.
विमानतळाचे नामांतर करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून (Aurangabad Airport Name Change) सातत्याने मागणी होत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेने देखील “ धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ” असे नाव करण्याबाबत ठराव संमत केला आहे. तसेच लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावास मान्यता दिली. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई असे करण्यात आले होते. तर कोल्हापूर विमानतळाचे नाव छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर असे करण्यात आले आहे. याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजीराजे विमानतळ केल्यामुळे औरंगाबाद शहराचे महापौर आणि उपमहापौर यांनी शिवसेनेचा खासदार चंद्रकांत खैरे यांचा सत्कार केला आहे. चंद्रकांत खैरेंचा विमानतळावरच सत्कार करण्यात आला.

Unlimited Reseller Hosting