Home मराठवाडा ग्रामीण डाक जीवन विम्याने कुटुंबातील बचत होते आणि विम्याचा लाभ मिळतो –...

ग्रामीण डाक जीवन विम्याने कुटुंबातील बचत होते आणि विम्याचा लाभ मिळतो – सुरेश सिंगेवार

12
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड , दि. २२ :- रोजी चिंचोली तांडा येथे डाक विभागाने आदर्श गाव निवडल्याने या गावात डाक अधीक्षक शिवशंकर बी लिंगायत व किनवट डाक निरीक्षक आभिनव सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड मुख्य पोस्ट ऑफिसचे मार्केटिंग एक्सिकेटीव्ह सुरेश सिंगेवार यांनी आज चिंचोली तांडा गावात भेट दिली.


मार्गदर्शन करताना म्हणाले की या गावातील महिलांना व पुरुषांना “संपूर्ण ग्रामीण डाक विमा'(एस. बी. जि) झाल्याने यामधून आपली बचत होते आणि घरा मधील प्रमुख व्यक्तीचा अपघाती व नैसर्गिक विमा असतो.
आणि गावात प्रत्येक माणसाला बचत्तीची सवय लागते. या मुळे आपला व गावाचा विकास होतो.
संपूर्ण गाव ग्रामीण डाक जीवन विम्यामुळे मुलीचे लग्न,मुला -मुलींचे शिक्षणासाठी मदत होते. एवढेच नाही तर महिलांना आर्थिक स्वतंत्र्य मिळते असे सिंगेवार यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला गावातील पोलीस पाटील,माजी उपसरपंच उपस्थित होते.
पुढे बोलताना सिंगेवार म्हणाले की ग्रामीण भागातील शेतकरी, आणि नागरिकांना इतर कंपन्याचे नावे सांगून व खोट्या योजनेची माहिती देऊन पैशाची लुबाडणूक करीत असल्याचे आपण दररोजच पेपर मध्ये वाचविण्यास बातम्या येत आहेत. या करिता पोस्ट ऑफिस पिढ्यानपिढ्या आपल्या गावात जनतेची सेवा देत आहे पण एकाही व्यक्तीचे पैसे पोस्ट कर्मचाऱ्यांनी घेतले म्हणून दूर दूर चर्चा एकवण्यास आपल्याला मिळत नाही.
प्रत्येकांना बचतीची सवय असली पाहिजे ती लहान असो किंवा मोठी ती बचत असते असे सिंगेवार यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तांड्यातील पोलीस पाटील पंडित बिरचंद राठोड यांनी गावातीळ लोकसंख्या एकशे साठ आहे तर कुटुंब प्रमुखाची संख्या पस्तीस आहे.
या तांड्यातील नागरिकांना ग्रामीण डाक योजना संबधी माहिती दिली व नागरिकांना चिंचोली तांडा संपूर्ण ग्रामीण डाक जीवन विमा करण्याचे अहवान केल्याने प्रत्येक घरातील एक व्यक्तीचे आपल्या नावे ग्रामीण डाक जीवन विम्याचा प्रस्ताव घेऊन आपले गाव आदर्श ग्रामीण डाक विमा केले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच नेमीचंद बिरचंद राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन अनुप नरोटे यांनी केले आहे.